Baramati Bypoll: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार तसेच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या तिघांपैकी एकही उमेदवार बारामती मतदारसंघातील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवरून एकही अर्ज न येता थेट बाहेरील इच्छुक उमेदवारांनी उमेदवाराने अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवार जत, सातारा आणि सोलापूर या ठिकाणातील उमेदवार असल्याची माहिती मिळाली. Baramati Bypoll Sunetra Pawar तिन्हीही उमेदवार बारामतीच्या बाहेरचे जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टीकडून, सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याही उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागली असून, तेही अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोणाचा अर्ज कायम राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Baramati Bypoll हेही वाचा: Top 10 News : ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस , सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार आणि रोमांचक लढतीत पंजाबचा 3 विकेट्सने विजय, वाचा अशा टॉप १० बातम्या