Top 10 News : शरद पवारांकडून नातवांना राजकारणाचं धडे अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहायला मिळालेत. सहयोग निवासस्थानातील समोर आलेल्या या व्हिडिओत पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगताना दिसताय. यावेळी त्यांच्यासोबत रोहित पवार देखील आहेत. शरद पवार आपल्या दोन्ही नातवांना बाजूला बसवून समजावत आहेत. तर रोहित आणि पार्थ पवार हे दोघेही शरद पवारांचं बोलणं शांतपणे समजून घेतायत. एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे पवार कुटुंबातील पुढच्या पिढीमध्ये समन्वय साधण्याचं काम स्वत: शरद पवार करत आहेत. यातून एक ‘आजोबा’ आणि ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून शरद पवार नातवांच्या पाठीशी उभे राहल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ZP निवडणुकीतही एक्झिट पोलनुसार भाजप मारणार बाजी महापालिका निवडणुकीनंतर शनिवारी झालेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप बाजी मारताना दिसत आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर अजितदादांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमाकांवर असणार आहे. एका एक्झिट पोलनुसार, या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजप २६३ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर शिंदेसेना १५६ जागा आणिअजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ११८ जागा जिंकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसल्याचे दिसून येत आहे. ठाकरेसेनेला ४८, मनसेला ६, काँग्रेसला ६१ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. Pune News : “तू मला पसंतच नाहीस!” लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी पत्नीचा मोठा गौप्यस्फोट; आठ महिन्यांत लग्न रद्द मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा मुंबईतील काही भागांमध्ये येत्या मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील 900 मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे अत्यावश्यक काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत तब्बल 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागांत पाणीपुरवठा पूर्णतः खंडित राहील, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. आज संत गजानन महाराजांचा 148 वा प्रकट दिन सोहळा आज संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रगट दिन उत्सव सोहळ्यानिमित्त बुलढाण्यातील शेगावात लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. शेयानिमित्त राज्यासह परराज्यातून 700 च्या वर दिंड्या व तीन लाख भाविक शेगावात दाखल झाले आहे. हा उत्सव भाविक भजन, कीर्तन करत मोठ्या श्रद्धेने गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा करत असतात. ‘गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, मंत्रघोषात संपूर्ण शेगाव दुमदुमन जाते. लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहेत. PMC News : नव्या कारभाऱ्यांसाठी ५ कोटींची वाहन खरेदी; प्रशासनाची ही अजब घाई कशासाठी? राज्यातील हवामानात सातत्याने बदल मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यातील काही भागात ऊन, थंडी आणि पाऊस अशी संमिश्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आज दिवसभर तापमानात चढउतार बघायला मिळेल. यासोबतच काही भागात ढगाळ तावावरण असेल. पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमानात घट झाली. शहरासह उपनगरातील किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाल्याने पहाटे आणि रात्रीच्या थंडीचा जोर काहीसा वाढला आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी? Top 10 News : अजित पवार यांच्या निधानानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सहा महिन्यांच्या आतच पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असल्याने येत्या एप्रिल मे महिन्यात मतदारसंघासाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील, असे बोलले जात आहे. पण दुसरीकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, अशीही मागणी केली जात आहे. जत्रेमध्ये पाळणा कोसळल्याने पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू हरियाणाच्या सूरजकुंड येथे आयोजित करण्यात आलेल्या जत्रेमध्ये पाळणा कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जत्रेच एकच गोंधळ उडाला आणि लोकांची धावाधाव सुरू झाली. पोलिस अधिकारी जगदीप प्रसाद यांचा बचाव कार्यादरम्यान मृत्यू झाला. बचावकार्य करत असताना पाळण्याचा एक तुकडा त्यांच्या डोक्याला लागला. गंभीर जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ..तर ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांवर दबाव वाढवेल अमेरिकेने चार वर्षापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन थांबवण्याच्या दृष्टीने करावयाच्या करारासाठी जूनपर्यंतची मुदत दिली असल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. ही मुदत पाळली गेली नाही, तर ट्रम्प प्रशासन दोन्ही देशांवर दबाव वाढवेल, असेही झेलेन्स्की यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उन्हाळ्यापूर्वी दोन्ही देशांनी करार करून एका ठोस भूमिकेवर सहमती केली पाहिजे, असे अमेरिकेला वाटते. मात्र असे घडले नाही, तर दोन्ही देशांवर अमेरिका दबाव वाढवेल, अशी भीती झेलेन्स्की मयांनी व्यक्त केली आहे. ST Bus Employee Protest: राज्यभरात पुन्हा लालपरीची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, काय आहे मागणी? रशियात ४ भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला Top 10 News : रशियातील बश्कोर्तोस्तानची राजधानी असलेल्या उफा शहरातील एका स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. एका अल्पवयीन मुलाने हॉस्टेलमध्ये घुसून हा हल्ला केला. यात ४ भारतीय विद्यार्थ्यांसह इतर काहीजण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासने शनिवारी रात्री या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच जखमींची सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही सांगितले. सूर्यकुमार यादव टी-२० विश्वचषकात ठरला हिरो भारताने मोठा संघर्ष करत अमेरिकेवर विजय मिळवून टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरूवात विजयाने केली आहे. भारताच्या या विजयाचा कर्णधार सूर्यकुमार यादव हिरो ठरला.. सूर्याने या सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या गाठून दिली. यासह सूर्यकुमार यादवने टी-२० इतिहासात मोठा पराक्रम केला आहे. त्याने या सामन्यात नाबाद ८४ धावांची खेळी करून भारताला ९ बाद १६१ अशीआव्हानात्मक संख्या गाठून दिली. याबाबत त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. टी-२० इतिहासात विराट कोहलीला मागे टाकत सर्वाधिक वेळेस सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहेसूर्याने १०५ टी-२० सामन्यांमध्ये १७ सामनावीर पुरस्कार मिळवले आहेत. NEET PG 2026 : दोन महिने वाया गेल्यावर अखेर मुहूर्त लागला! वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाची तिसरी फेरी ‘या’ तारखेपासून