Baramati election : अजित पवार यांच्या निधानानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने आता प्रशासकीय तयारी सुरू केली असून, मतदार यादी अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. खरंतर ज्या विधानसभेची जागा विविध कारणांमुळे रिक्त होते. त्यानंतर ६ महिन्यांच्या आतच संबंधित ठिकाणी पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सहा महिन्यांच्या आतच पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असल्याने येत्या एप्रिल मे महिन्यात मतदारसंघासाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, १ जानेवारी २०२६ हा ‘अर्हता दिनांक’ निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या तरुणांनी १ जानेवारी २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना या यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी या मतदारसंघाची एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे वगळून ही यादी अधिक पारदर्शक आणि अद्ययावत केली जाणार आहे. या प्रारूप यादीत मतदारांना आपली नावं तपासता येतील. नाव नसल्यास किंवा दुरुस्ती असल्यास विहित मुदतीत दावे आणि हरकती नोंदवता येतील. सर्व दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर मार्च महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या विधीमंडळाच्या सदस्या नसल्याने अनेकांकडून विविध प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आता पोटनिवडणूक होणार हे जवळपास निश्चित असल्याने सुनेत्रा पवार या बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील, असे बोलले जात आहे. पण दुसरीकडे अशीही मागणी केली जात आहे की ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी. सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क ७ फेब्रुवारीला जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जात आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार यांच्या शिवाय त्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीसाठी मतदान केले. हेही वाचा : ST Bus Employee Protest: राज्यभरात पुन्हा लालपरीची चाके थांबणार? कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष, काय आहे मागणी?