Ravindra Chavan | भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर येथे आयोजित सभेला हजेरी लावली होती. या सभेतून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. रवींद्र चव्हाण यांनी लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील अशा प्रकारच्या केलेल्या विधानाविरोधात काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. या विधानानंतर विलासराव देशमुख यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने फेसबुकवरून व्हिडीओ शेअर करत संयमीपणाने प्रत्युत्तर दिल. मात्र या वाढत्या वादानंतर आता रवींद्र चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत विलासराव देशमुख यांच्या चिरंजीवांची काही वेळातच दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांनी रवींद्र चव्हाण यांना विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या विधानावर ठाम आहात का? असा सवाल केला. काँग्रेस पक्षाचा अजेंडा हा पूर्ण विलासरावांच्या भोवती केंद्रित त्यावर रवींद्र चव्हाण म्हणाले, “मी विलासराव देशमुख यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीकाटिप्पणी केली नाही. विलासराव हे मोठे नेते होते. मुख्यमंत्री म्हणून काम केलं, मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा अजेंडा हा पूर्ण विलासरावांच्या भोवती केंद्रित झालेला दिसत आहे. काँग्रेस पक्ष हा आताही विलासरावांकडे पाहून आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं. विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागत आहे.” विलासरावांच्या चिरंजींवांची दिलगिरी व्यक्त करतो पुढे ते म्हणाले, “आता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेलं काम, महायुतीच्या माध्यमातून झालेलं काम, या सर्व गोष्टी विकासात्मक दृष्टीकोनातून या ठिकाणी झालेल्या आहेत. त्याचा संदर्भ घेऊन मी तसं म्हटलं. तरीसुद्धा त्यांचे चिरंजीव, जे माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांच्या चिरंजींवांची दिलगिरी व्यक्त करतो,” असे सांगून चव्हाण यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. Ravindra Chavan | नेमकं काय म्हणाले होते रवींद्र चव्हाण? लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण शहरात आले होते. यावेळी त्यांनी सभा घेत भाषण केले. या भाषणातून रवींद्र चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करताना दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल विधान केले. ते म्हणाले, “लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. हा उत्साह पाहून लक्षात येते की, लातूर शहरातून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, यात कोणतीही शंका नाही.” रितेश देशमुखचे प्रत्युत्तर Ravindra Chavan | रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या या विधानंतर रितेश देशमुखने फेसबुकवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत, “दोन्ही हात वर करून सांगतो. लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेल्या असतात. लिहिलेलं पुसता येतं. कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.” अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर लगेच रवींद्र चव्हाण यांनी रितेश देशमुखची दिलगिरी व्यक्त केली. Ravindra Chavan | हेही वाचा: “..तेव्हा मी उशीत डोके ठेवून रडते”; कारण.. प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा म्हणाली “सर्वांना काम करताना…”