Sunil Tatkare : एकीकडे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात ( Ashok Kharat) याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर चौकशीतून धक्कदायक माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याच्याशी जवळीक नडली आणि त्यांना आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरुन पाय उतार व्हावे लागेल. त्यांचे खरातसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खरातसोबतचे अनेक राजकीय नेत्यांचे सुद्धा फोटो व्हायरल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांचा देखील फोटो अशोक खरात सोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर सुनील तटकरे यांच्या बोटाला जखम झाली असल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला असून, फोटोला घेऊन दावे केले जात आहे. त्यामुळे तर्क वितर्कांना उधान आले असतानाच सुनील तटकरे यांनी त्यांच्या हाताच्या बोटाला नेमकी कशामुळे जखमी झाली होती, याचा खुलासा स्वतः पत्रकार परिषदेतून केला आहे. गाडीच्या दरवाज्यामध्ये बोट अडकल्यामुळे जखम Sunil Tatkare Sunil Tatkare : हाताच्या बोटाला जखम कशामुळे झाली होती? सुनील तटकरेंनी 2024 ची घटना सांगितली “माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना दोन अगोदर कापलं गेलं होतं. अलिबाग येथील मधू ठाकूर यांची समाधीचे दर्शन घ्यायला गेलो होते. दर्शन घेऊन परताना अॅड. प्रविण ठाकूर मला भेटले. त्यांना भेटून निघत असताना त्यांनी गाडीचा दरवाजा लावला आणि दरवाज्यात बोटाला अकडल्याने जखम झाली. असल्याचा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे.” तसेच ही घटना 2024 मध्ये घडली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. हेही वाचा : Dhurandhar2: ‘धुरंधर २’ची यालिना नेमकी कोण? रिअल लाईफ कनेक्शनमुळे वाढली उत्सुकता! सोशल मीडियावर हाताच्या बोटाला जखम झालेला जुना फोटो प्रसिद्ध करत विविध आरोप केले जात आहेत. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी हे दुर्देव आहे दुसरं काय म्हणू अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत सुरू आहे. प्रमुख म्हणून सातपुते आहेत. मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आश्वासन सभागृहात दिले आहे. आज त्या प्रकरणावर मुख्यमंत्री सभागृहात निवेदन देणार आहेत. माझी देखील खरात प्रकरणाची सखोल तपासाची मागणी आहे. पुढे सुनील तटकरे म्हणाले, माझ्या चाळीस वर्ष राजकीय कारकीर्दीमध्ये अशा अनेक आरोपांमधून मी गेलो आहे. माझी काम करण्याची पद्धत, संवेदना माझ्या जिल्ह्यातील नागरिकांना माहिती आहे. ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहोत. हेही वाचा : Gold Silver Price Today: सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरूच ! चांदीत ८५०० रुपयांची घसरण ; जाणून घ्या आजचा सोन्या -चांदीचा भाव