Harshavardhan Sapkal : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ज्या प्रकरणामुळे खळबळ उडवून दिली ते नाशिकचे भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक राजकीय नेते या प्रकरणामुळे रडारवर असल्याची चर्चा आहे. अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात आता आर्थिक फसणूक, गैरव्यवहार, खंडणी यांसारख्या गुन्ह्यांचा देखीस समावेश झाला आहे. एसआयटीकडून प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणामुळे खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर नराधम अशोक खरात याने केलेल्या घृणास्पद कृत्याप्रकरणी त्याला कठोरातील कठोर शिक्षेची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. Harshavardhan Sapkal खरातसोबत राजकीय नेत्यांची देखील चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर विचार करायला लावणारी पोस्ट शेअर केली आहे. या आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे. राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत. मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो,… pic.twitter.com/hozIUejlhU — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) March 31, 2026 पोस्टमधून त्यांनी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधत चार सवाल उपस्थित केले आहेत. आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत. या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकलीय का ? किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली काय ? याबाबत राज्यातील पोलिस महासंचालकांना त्या भेटल्यात का ? राज्यातील पिडीत महिलांना न्याय मिळेल, असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केलीय का ? असे सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी केलेल्या या प्रश्नांना आदिती तटकरे उत्तर देणार का? हे पाहावे लागणार आहे. नेमकं काय म्हणाले सपकाळ? Harshavardhan Sapkal या आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे. राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत. मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, हृषीकेश वैद्य, काल समोर आलेलं नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण असो. रोज राज्यातील महिला भगिणींसोबत अत्याचार झाल्याच्या बातम्या, प्रकरणं समोर येत आहेत. Harshavardhan Sapkal : खरात प्रकरणामुळे संतापाची लाट; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची विचार करायला लावणारी पोस्ट, आदिती तटकरेंना चार सवाल पण, आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत. या सर्व घटनांवर काही एक प्रतिक्रिया आपण त्यांची ऐकलीय का ? किंवा या प्रकरणानंतर याबाबत त्यांच्या खात्याअंतर्गत यावर एखादी बैठक घेतली काय ? याबाबत राज्यातील पोलिस महासंचालकांना त्या भेटल्यात का ? राज्यातील पिडीत महिलांना न्याय मिळेल, असा विश्वास देणारं ट्विट किंवा पोस्ट तरी त्यांनी केलीय का ? जर या मंत्री महोदयांना स्वतःची जबाबदारी काय आहे, हेच समजत नसेल, तर यांनी राजीनामे देऊन घरी बसावं. आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात वेळ घालवावा. उगाच मंत्रीपदाची खुर्ची उबवू नये, असा बोचरा निशाणा साधला आहे. Harshavardhan Sapkal हेही वाचा : US Strikes : इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर अमेरिकेचा हवाई हल्ला ; इस्फहान शहरावर बंकर-बस्टर बॉम्बहल्ले