Nitesh Rane | भाजप नेते आणि राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘सुवर्ण गड’ बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्या आहेत. यावरून नितेश राणे यांच्या निवासस्थानाबाहेर घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची तपासणी सुरू आहे. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. याठिकाणी येण्या-जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ब्राऊन कलरचा टी-शर्ट, ब्लॅक कलरचे जॅकेट आणि पँट घातलेला एक तरुण हातामध्ये ब्लॅक कलरची ट्रॉली बॅग घेऊन येताना दिसत आहे. हा तरुण नितेश राणे यांच्या बंगल्याजवळ येतो आणि तो त्याठिकाणी ही बॅग सोडून निघून जातो. Nitesh Rane | बॅगसोबत एक चिठ्ठी बॅगसोबत एक चिठ्ठी ठेवण्यात आली आहे. ‘बॅगमध्ये ठेवलेले बूट आणि कपडे हे तुम्ही घेऊ शकता ‘असे या चिठ्ठीत लिहिले आहे. दरम्यान, ही बॅग नेमकी कुणाची आहे, ती तिथे कशा उद्देशाने ठेवण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. Nitesh Rane | मागील काही दिवसापासून नितेश राणे आक्रमकपणे हिंदुत्वाची भूमिका मांडत आहेत. नितेश राणेंची आज छत्रपती संभाजी नगरमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वीच त्यांच्या बंगल्याबाहेर ही बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा: वाघोली : अष्टापुर येथे दुसरा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश