EVM Strong Room | राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान करण्यात आले. मात्र मतमोजणी 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता अनेक दिवस स्टाँगरूममध्ये ईव्हीएम मशिन ठेवण्यात येणार आहे. तब्बल 18 दिवस तेथील सुरक्षा व्यवस्थाचा चोख बंदोबस्त करणे हे प्रशासन आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदमधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे हॉलसमोर बहुसंख्य नागरिक जमा झाले होते. आष्टा नगर परिषदेमधील मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप केला. वेबपोर्टलवरून मतदानाच्या टक्केवारीबाबत आकडेवारी मिळाली. मतदान जास्त असल्याचा आरोप प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला. एकूण मतदार संख्या ३३ हजार ३२८ दाखवली, एका प्रभागात १३११ मतदान असताना तिथे ४ हजार मतदान दाखवले आहे. ६ नंबर प्रभागात एकूण मतदान ३ हजार ५६ आहे. यात मतदान २३९४ झाले आहे तिथे १७९५ मतदान दाखवले आहे. यासारख्या अनेक त्रुटी दिसून येत असल्याचादावा उमेदवारांनी केला आहे. पोर्टलवरील यादीत एकूण 33,028 मतदार दाखवले असून झालेलं मतदान 24,913 एवढ झालेलं आहे. पण, खरं मतदान 22864 इतकंच झालं आहे. म्हणजे, तब्बल 2900 मतदान जास्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. EVM Strong Room | दरम्यान, आष्टा शहर विकास आघाडीचे विशाल शिंदे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. तर, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि महायुतीकडून प्रवीण माने हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. मात्र, आता गोंधळ झाला त्यावेळी स्ट्राँगरुमच्या समोर फक्त आष्टा शहर विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप तर गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाडी आरोप करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना यांच्यासह शरद पवारांच्या पक्षातील उमेदवारांनी तहसिल कार्यालयाला घेराव घातला. जवळपास १२ तास कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर रात्री उशिरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला आहे. हेही वाचा : राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीयसह क्रीडा आणि मनोरंजनाच्या टॉप १० बातम्या, वाचा एका क्लिकवर