VK Singh on Ajit Pawar plane crash : अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात व्हीएसआर कंपनी आणि कंपनीचे मालक रोहित सिंगवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच हा अपघात नसून घातपात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या सीआयडीने पुण्यातील ऑफिसमध्ये व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. पुणे सीआयडीने बीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंह यांची सलग तीन दिवस चौकशी केली आहे. यामध्ये व्ही.के. सिंह (VK Singh ) यांनी अजितदादांच्या विमान अपघातावर धक्कादायक जबाब दिला आहे. “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रकरणात पायलट सुमित कपूर याची चूक आहे. अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा,” असे व्ही.के.सिंग यांनी म्हटले आहे. दरम्यान, व्ही.के.सिंग यांनी दिलेल्या धक्कादायक जबाबामुळे प्रकरणास नवे वळण प्राप्त झालं आहे. अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार आणि पुत्र जय पवार यांनी यापूर्वीच व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले असल्याने या जबाबाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. VK Singh on Ajit Pawar plane crash Ajit Pawar व्ही. के. सिंगला पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट – रोहित पवार काल चौकशीसाठी आलेल्या व्ही. के. सिंग यांना पोलिसांकडूनच VIP ट्रिटमेंट देण्यात आल्याचे म्हणत रोहित पवार यांनी ट्वीट करत लिहिले की, “ज्याच्या विमान अपघातामुळं अजितदादांना आपल्यातून हिरावून नेलं त्या VSR कंपनीचा मालक व्ही. के. सिंग काल चौकशीसाठी CID कार्यालयात आला असता बघा त्याचे हे बंदुकधारी बॉडीगार्ड…” “हा जर धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे तर याला नेमकी कुणाची भीती वाटते? की हा स्वतःला एखादा जागतिक नेता समजतो? पोलिसांच्याच विभागात आला असताना त्याला एवढी सुरक्षा का घ्यावी लागते? ज्याला CID कार्यालयात गाडी नेण्यास परवानगी दिली जाते आणि ‘‘मेरी ऊपर से नीचे तक पहुँच है’’ अशी उद्दाम भाषा जो वापरतो, तो नेमका कोण लागून गेला?,” असे काही सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. VK Singh on Ajit Pawar plane crash : हेही वाचा : Amol Mitkari : व्ही. के. सिंगकडून पिंकी माळीच्या कुटुंबीयांना धमकी? अमोल मिटकरींच्या ट्वीटने खळबळ