Uran Nagarparishad Election। राज्यातल्या नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच रायगडच्या उरणमध्ये मतमोजणी केंद्रबाहेरून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उरण नगरपरिषदेच्या () मतमोजणी केंद्रावर राडा झाल्याची माहिती आहे. नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून एक इसम स्ट्राँग रुमच्या दिशेने गेल्याचा प्रकार घडलाय. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत आरोप केले आहे. मतमोजणीला अवघे काही मिनिटे उरले असताना हा प्रकार घडल्याने मतमोजणी केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झालंय. Uran Nagarparishad Election। दरम्यान, मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना ही व्यक्ती स्ट्राँग रुमकडे कशी गेली ? असा सवाल महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांनी तहसीलदारांना केलाय. सध्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत या प्रकरणात हस्तेक्षेप केला. मात्र या सर्व प्रकारानंतर मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. Uran Nagarparishad Election।