Trump On Jeffrey Epstein Files। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टाईन फाइल्समधील प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंविषयी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी याविषयी बोलताना,” लैंगिक गुन्हेगाराशी संबंधित तपास फाइल्स प्रसिद्ध झाल्यामुळे जेफ्री एपस्टाईनला भेटलेल्या निष्पाप लोकांची प्रतिष्ठा खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे” असे म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने या फाइल्स प्रसिद्ध करण्यास सुरुवात करण्यात आलीय. त्यांच्या पहिल्याच टिप्पण्यांमध्ये ट्रम्प यांनी या मुद्द्याला त्यांच्या पक्षाच्या चांगल्या कामगिरीपासून लक्ष विचलित करण्याचा एक प्रयत्न असल्याचे म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी त्यावेळी बोलताना, “हे संपूर्ण एपस्टाईन प्रकरण रिपब्लिकन पक्षाच्या प्रचंड यशापासून लक्ष विचलित करण्याचा एक मार्ग आहे.” असे म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित छायाचित्रांच्या पहिल्या बॅचमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना प्रमुखपणे दाखवण्यात आले होते याविषयी ट्रम्प यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. “बिल क्लिंटनचे फोटो पाहून दुःख” Trump On Jeffrey Epstein Files। यावेळी ट्रम्प म्हणाले, “मला बिल क्लिंटन आवडतात. माझे त्यांच्याशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. त्यांचे फोटो बाहेर येत असल्याचे पाहून दुःख होते.” ते पुढे म्हणाले, “माझेही फोटो आहेत. या माणसाशी (एपस्टाईन) सर्वांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.” ट्रम्प यांनी क्लिंटन आणि इतरांच्या छायाचित्रांच्या प्रकाशनाला आक्षेप घेतला आणि ते एक भयानक गोष्ट म्हटले. त्यांनी म्हटले की बिल क्लिंटन हे एक मोठे माणूस आहेत आणि ते ते हाताळू शकतात.” असे म्हटले आहे. ‘निरपराध लोकही यात अडकले’ Trump On Jeffrey Epstein Files। जेफ्री एपस्टाईनशी संबंधित फायलींच्या प्रकाशनाबाबत त्यांनी,”तुमच्याकडे कदाचित इतर लोकांचे फोटो देखील असतील जे अनेक वर्षांपूर्वी जेफ्री एपस्टाईनला निष्पापपणे भेटले होते, ज्यात अत्यंत आदरणीय बँकर्स, वकील आणि इतर लोकांचा समावेश आहे. एपस्टाईनशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचे फोटो प्रसिद्ध होत असल्याने बरेच लोक अत्यंत नाराज आहेत” अशी माहिती देखील त्यांनी दिली. त्यांनी म्हटले की, ते लोक त्यांच्यासोबतच्या फोटोंमध्ये आहेत कारण ते एका पार्टीत होते आणि त्यामुळे एखाद्याची प्रतिष्ठा खराब होते. श्रीमंत आणि प्रभावशाली फायनान्सर असलेले एपस्टाईन यांचे २०१९ मध्ये न्यू यॉर्क तुरुंगात लैंगिक तस्करीच्या आरोपांखाली अटकेत असताना निधन झाले.