Mamata Banerjee | तृणमूल काँग्रेसची प्रचार यंत्रणा सांभाळणाऱ्या ‘आयपॅक’ कंपनीवर गुरुवारी ईडीने टाकलेल्या छापेसत्रानंतर राजकारण तापले आहे. शुक्रवारी तृणमूलच्या खासदारांनी केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत दिल्लीतील गृहमंत्रालयाबाहेर 8 तृणमूल काँग्रेस खासदारांनी निदर्शने केली. डेरेक ओब्रायन, महुआ मोईत्रा आणि कीर्ती आझाद घोषणाबाजी करताना दिसले. पोलिसांनी सकाळी 10 वाजता खासदारांना ताब्यात घेतले आणि दुपारी 12 वाजता त्यांना सोडून दिले. अमित शाह यांच्याविरुद्ध पेन ड्राइव्ह या कारवाईनंतर, ममता बॅनर्जी यांनी एक्स वर लिहिले की, “गृहमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करणे हा आपल्या निवडून आलेल्या प्रतिनिधींचा लोकशाही अधिकार आहे. त्यांना रस्त्यावर ओढणे हा कायदा अंमलबजावणी नाही तर पोलिसांचा अहंकार दाखवण्याचा प्रयत्न आहे.” यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले आणि कोलकातामध्ये मोर्चाचे नेतृत्वही केले. तसेच ममता बॅनर्जी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध पेन ड्राइव्ह असल्याचा दावा केला. Mamata Banerjee | कोळसा घोटाळ्याचे पैसे वापरले “कोळसा घोटाळ्याचे पैसे दिल्लीतील वरिष्ठ भाजप नेत्यांपर्यंत पोहोचतात. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. गरज पडल्यास मी ते जनतेसमोर सादर करू शकते. सुवेंदू अधिकारी यांनी कोळसा घोटाळ्याचे पैसे वापरले आणि ते अमित शहांना पाठवले. मी सहसा प्रतिक्रिया देत नाही, पण जर कोणी मला चिथावणी दिली तर मी त्यांना सोडणार नाही,” असा थेट इशाराच ममता यांनी दिला. Mamata Banerjee | दरम्यान, न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी आणि गोंधळ असल्याने कोलकाता उच्च न्यायालयाने ईडीच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. छाप्यांदरम्यान हस्तक्षेप केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. Mamata Banerjee | हेही वाचा: Parineeti Chopra: ‘सकाळी उठताच मोबाईलपासून दूर राहा’; आई झाल्यानंतर आरोग्य कसं जपलं, याबद्दल परिणीती चोप्राने दिल्या हेल्थ टिप्स