कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू Top 10 News: राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलय. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिलीय. प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीबाबत बोलताना, मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कुणी डावलू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे, असं वक्तव्य तनपूरे यांनी केलंय. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू असे सांगताना तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने, प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात. Prajakt Tanpure : राज्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. तर पुढील दोन दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने घट झाली असून, काल अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम होती. Top 10 News अवकाळी पाऊस मराठवाड्यापासून उत्तर कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावत उन्हाच्या वाढत्या चटक्यावर काहीशा दिलासा दिला. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांसह कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. राज्यात पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. पूर्व प्राथमिक शाळांसाठी येणार नवा कायदा? पूर्व प्राथमिक शाळांसाठी नवीन कायदा आणण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा कायदा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. राज्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व प्राथमिक शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे, यासाठी खासगी पूर्व प्राथमिक शाळांची शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील प्री-स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलंय. या पोर्टलवर नोंदणी करताना शाळेचे स्थान, वर्गखोल्यांची संख्या, व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची संख्या, पायाभूत सुविधा, शाळेची इमारत, क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सीसीटीव्ही तसेच शिक्षक व कर्मचारी याबाबतची माहिती देणे अपेक्षित असणार आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार ७३३ खासगी पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांची नोंदणी झाली आहे. उर्वरित संस्थांनाही नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी दिली आहे. जुन्या गाड्यांसाठी नवे नियम पुणे शहराच्या मध्यवस्तीत आता तुमच्या जुन्या वाहनांना एण्ट्री मिळवणे महागात पडू शकते. वाढत्या वायू प्रदूषणावर लगाम लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने या भागात ‘लो एमिशन झोन’ लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे जास्त प्रदूषण करणाऱ्या जुन्या वाहनांवर प्रदूषण शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वाहतूक तज्ज्ञ उपस्थित होते. शहरातील 46 टक्के प्रदूषण हे केवळ वाहनांमुळे होत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. यातही धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील 70 टक्के वाहने अजूनही BS-IV किंवा त्यापेक्षा जुन्या तंत्रज्ञानाची आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी या हालचाली सुरु झाल्याचं बोललं जातं. विनोद तावडेंवर महत्वाची जबाबदारी Top 10 News: देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा होत नाही तोच भाजप कामाला लागली आहे. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपनं त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. विनोद तावडे यांच्या खांद्यावर केरळमध्ये पहिला विजय मिळविण्याचे आव्हान असणार आहे. केरळमध्ये भाजपला एकदाही विधानसभेत बहुमत मिळालेले नाहीये. केरळमध्ये सध्या भाजपचा एकही आमदार नसल्याने तावडे यांना थेट शुन्यापासून सुरूवात करावी लागणार आहे. तावडे यांच्यासाठी हे शिवधनुष्य ठरणार आहे. केरळमध्ये ९ एप्रिलला मतदान असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच तावडे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत कार्यकर्त्यांना भाजप सत्तेत येईपर्यंत थांबू नका, असे आवाहन केले आहे. ओडिशाच्या सरकारी रुग्णालयात भीषण आग ओडिशाच्या कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आज पहाटे लागलेल्या आगीत किमान १० रुग्णांचा मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागात लागलेली आग आयसीयूच्या एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक तपासातून समोर आलंय.आग पहाटे २.३० ते ३ च्या दरम्यान लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, अधिकाऱ्यांनी सांगितले की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन चरण माझी घटनास्थळी पोहोचले. आयसीयूमध्ये एकूण २३ रुग्ण होते, त्यापैकी ७ रुग्णांचा आयसीयूमध्येच होरपळून मृत्यू झाला, तर तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तसंच, इतर जखमी रुग्णांना तातडीने मेडिकल कॉलेजच्या इतर वॉर्डमधील आयसीयूमध्ये हलवण्यात आले. त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचं म्हटलं जातंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही संरक्षण देणार-ट्रम्प अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा आजचा 17 दिवस आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरुच आहेत. इराणकडूनही प्रत्येक हल्ल्याला तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं जात आहे. याचदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना महत्वाचं आवाहन केलं आहे. जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वाचं विधान केलं आहे.’होर्मुझच्या सामुद्रधुनीतमिळून पेट्रोलिंग करु’ असा प्रस्ताव डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल ग्राहक देशांना दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत आम्ही जहाजांना संरक्षण देणार आहोत, अनेक देशांशी बोलत आहोत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. बांगलादेशला भारत ४० हजार टन इंधन पुरवठा करणार मध्य पूर्वेत सुरु असणाऱ्या युद्धामुळे जगात होणारा तेल पुरवठा ठप्प झालाय. अशा स्थितीत अनेक देशांपुढे इंधन टंचाईचं मोठं संकट उभे राहिलंय. अशातच आता शेजारील बांगलादेशनं इंधन पुरवठा स्थिर करण्यासाठी भारताला मदतीचा हात मागितला आहे. बांगलादेश एप्रिलपर्यंत भारतातून अतिरिक्त 45,000 टन डिझेल आयात करेल, असं सांगितलं गेलंय. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसी) नुसार, भारतातून अलीकडेच 5,000 टन डिझेल आले आहे, तर 18 किंवा 19 मार्चच्या सुमारास आणखी 5,000 टन डिझेल येण्याची अपेक्षा आहे. अशातच शेजारील बांगलादेश ने भारताकडून अतिरिक्त 45,000 टन डिझेल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. “आम्हाला भारतातून अतिरिक्त 40,000 टन डिझेल आयात करण्याचा प्रस्ताव मिळाला आहे. प्रक्रियात्मक काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच एलसी उघडणे आणि इतर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, हे 40,000 टन डिझेल एप्रिलपर्यंत बांगलादेशात देखील पोहोचेल,” असे बीपीसीचे महाव्यवस्थापक मोहम्मद मुर्शेद हुसेन आझाद म्हणाले. सरफराज अहमदची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार सरफराज अहमद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. जवळपास दोन दशकं पाकिस्तान क्रिकेटची सेवा करणाऱ्या सरफराजच्या या निर्णयासह सर्वांना धक्का बसलाय. सरफराज अहमदने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं. त्याने 54 कसोटी, 117 एकदिवसीयआणि 61 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने एकूण 6164 धावा आल्या, ज्यामध्ये 6 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. यष्टीरक्षक म्हणून त्याने 315 झेल टिपले, तर 56 फलंदाजांना स्टंपआउट केले. कर्णधार म्हणूनही सरफराजनं पाकिस्तानसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळला. तर त्याच्या कर्णधारपदाच्या काळात पाकिस्तान टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नंबर-1 वर पोहोचला. सरफराजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टी-20मध्ये सलग 11 मालिका जिंकण्याचा जागतिक विक्रम केला, तसेच 6 वेळा प्रतिस्पर्धी संघांना क्लीन स्वीप दिला. अंकिताकडून मुख्यमंत्र्याचे कौतुक Top 10 News: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनं तिच्या पतीसोबत नुकतीच एका वृत्तसमुहाच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेली. यादरम्यान अंकिताला ‘तुझ्या मते महाराष्ट्राच्या नेत्यांमधील खरा बिग बॉस कोण?’, असं विचारलं. त्यावर अंकिता वालावलकरनं अनेक मराठी माणसांच्या मनातलं उत्तर दिलं. अंकिता वालावलकर म्हणाली की, “नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शक या तीन बाबींचा विचार केला तर, मला वाटतं बिग बॉस हे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील…” पुढे बोलताना, “आपण आपल्या कुटुंबात मराठी भाषा जपली पाहिजे आणि सगळ्यांचा भाषांचा आदर करून आपण आपली भाषा टिकवली पाहिजे…”, असं म्हणत अंकितानं मराठी भाषेबाबतची तळमळ व्यक्त केली. दरम्यान , अंकिताने दिलेल्या या उत्तराने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलय.