बारामतीमध्ये सुनेत्रा पवार गाठणार “मॅजिक फिगर”? Top 10 News : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार का? याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. सकाळीपासून मतमोजणी सुरु आहे. महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठे रेकॉर्डब्रेक मताधिक्य मिळवण्याचा दावा महायुतीकडून केला जात आहे. बारामती पोटनिवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांचा एकही उमेदवार रिंगणात नसल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी मानली जात आहे. फक्त विजय नाही तर सर्वोच्च मताधिक्य मिळवून विक्रम करण्याच्या उद्देशाने महायुतीने जोर लावला. त्यामुळं बारामतीमध्ये अजितदादांचा विक्रम मोडणार का? नवा ‘रेकॉर्ड’ होणार की का? याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत. योगीप्रमाणे राज्य सरकारने निर्णय घ्यायला हवा पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे.दरम्यान,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना फोन करुन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन दिल. तसंच सांत्वन करतानाही माझ्याकडे शब्द नाही. तुमच्या पोटचा गोळा गेलेला आहे.आम्ही तुमच्यासोबत आहोत. एवढा विश्वास ठेवा की तो आरोपी जिंवत राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी पीडित मुलीच्या वडिलांना दिला. तर आरोपीच्या वडिलांनी, जसं योगी सरकार निर्णय घेतात, तसेच महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यायला हवा. आरोपी तीन महिने, सहा महिने, एक वर्षे, दोन वर्षे जगताच कामा नये, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली. उद्धव ठाकरेंनी बड्या नेत्याला पदावरून हटवलं विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर आली असताना राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घड्तायेत. विधान परिषदेच्या निवडणुकांआधी ऑपरेश टायगरची चर्चा सुरू होती. ठाकरेंचे खासदार शिंदेच्या पक्षात जाणार असल्याचं चर्चांना पेव फुटले होते.अशातच उद्धव ठाकरेंनी पक्षात सर्जिकल स्ट्राइक केलंय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. ठाकरे सेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव पक्षाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहेत. संजय जाधव हे ठाकरे सेनेसोबत आहेत, असं खुद्द उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगतिले होते. त्याचदरम्यान आता परभणीमधील एक राजकीय बातमी आहे. ज्यामुळे खळबळ उडवून दिली आहे. पक्षाकडून परभणी जिल्हा प्रमुखाला तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे. गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख पदी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करून खासदार संजय (बंडू जाधव ) यांना ठाकरेंनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. राज्यात उष्णतेची जीवघेणी लाट महाराष्ट्रात उष्माघाताची तीव्र लाट आहे. उपराजधानी नागपूरमध्ये उष्माघातामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर अकोल्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. वाढत्या तापमानामुळे पशूधनही धोक्यात आलंय. उन्हाचा पारा 40 अंशांच्यावर गेल्याने मुंबईसह महाराष्ट्र तापला आहे. विदर्भात तर उष्माघाताने कहर केलाय. अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 45 अंशांच्यावर तापमान गेल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वेगाने वाढत असून एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. परीणामी भारतातही उन्हाचा तडाखा वाढणार आहे. मात्र हा उष्माघात जीवघेणा ठरत असल्याने संपूर्ण मे महिना आरोग्याची काळजी घेणे हेच आपल्या हातात आहे. नागपूरमधील नायब तहसीलदाराची आत्महत्या नागपूरमधील हिंगणा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मौदा येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय अधिकाऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. वैभव रामेश्वर राठोड असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. बायको अन् मुले बाहेर गेल्यानंतर राठोड यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ते मागील काही दिवसांपासून तणावात असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. वैभव राठोड हे वानाडोंगरी येथील ग्रीन फिल्ड सोसायटीत राहायला होते. रविवारी त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेले. त्यानंतर ते घरात एकटेच होते, त्यावेळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, अजून कोणतीही सुसाईड नोट हाती लागलेली नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. राठोड यांनी आयुष्याचा दोर कापल्याने कुटुंबावर आणि कार्यालयात शोककळा पसरलीय. देशाच्या 5 राज्यांचा आज निकाल Top 10 News : देशाच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालसह, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहे. प्रादेशिक अस्मिता, विकास आणि सत्तापालटाची लाट अशा विविध मुद्द्यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकीसाठीच्या मतमोतणीला, आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हिमंता बिस्वा सरमांसह अनेक दिग्गज नेत्यांच्या भविष्याचा फैसला आजच्या निकालांवर अवलंबून आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता राखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्वस्व पणाला लावलंय. तर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे भाजपची सत्ता यावी यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले होते.त्यामुळं मतदारराजाने नेमका कोणाला कौल दिलाय जे आज ठरणार आहे. Election Results 2026: बंगालमधील बिधाननगरच्या मतमोजणी केंद्राबाहेर रात्री गोंधळ पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बिधाननगर याठिकाणी काल रात्री मतमोजणी केंद्राबाहेर अभूतपूर्व राडा झाल्याच बघायला मिळाल. यात तृणमूल काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये संघर्ष उफाळून आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्ट्रॉंग रूमसमोर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये झालेल्या वादातून तणाव निर्माण झाला. या घटनेदरम्यान घोषणाबाजी आणि प्रति-घोषणाबाजी झाली, ज्याचे लवकरच संघर्षात रूपांतर झाले.दरम्यान, या प्रकरणावर भाजपने आरोप केला आहे की, तृणमूल कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरील त्यांच्या कॅम्पवर पक्षाचे झेंडे फडकवल्यामुळे हा वाद सुरू झाला. तर तृणमूल काँग्रेसने दावा केला की, केंद्रीय दलांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. किंबहुना, केंद्रीय दल आणि बिधाननगर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने केंद्रीय दल घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही घटनास्थळी येऊन समर्थकांना पांगवले. नंतर, तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांना वेगळे करण्यात आले आणि त्यांच्यामध्ये बॅरिकेड्स उभारण्यात आले. ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर वेतन संरचना, महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल करण्याच्या तयारीला आता वेग आला आहे. जर आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात लक्षणीय वाढ होऊ शकते. जवळपास ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा परिणाम अंदाजे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख निवृत्तीवेतनधारकांवर होईल. सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून ५१,४८० रुपयांपर्यंत वाढू शकते. ही वेतनवाढ वेतनश्रेणीच्या १८ वेगवेगळ्या स्तरांवर आधारित असेल. प्रत्येक स्तरावरील सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या सध्याच्या मूळ वेतनानुसार वेगवेगळ्या सुधारणा दिसून येईल. डबल हेडरनंतरही गुणतालिकेत कोणताही बदल नाही आयपीएल 2026 मध्ये 3 मे रोजी काल झालेल्या ‘डबल हेडर’ नंतरही गुणतालिकेतील संघांच्या क्रमांकात कोणताही बदल झालेला नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सने विजय मिळवला असला तरी, त्यांना आपल्या जुन्या स्थानावरच समाधान मानावे लागले आहे. दुसरा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झाला. पण, या दुहेरी सामन्यांनंतरही गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांनी आपापले सामने जिंकले, परंतु कोणालाही कोणताही फायदा झाला नाही. पहिल्या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला सात गडी राखून पराभूत केले. हा कोलकाता नाईट रायडर्सचा या हंगामातील तिसरा विजय होता. त्यांनी एकूण 9 सामने खेळले असून आता त्यांचे 7 गुण आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्दही झाला होता. या 7 गुणांसह ते आठव्या स्थानावर कायम आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादला 10 सामन्यांमधील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले, परंतु ते 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. पण, त्यांच्या नेट रन रेटमध्ये घट झाली आहे. ‘खतरों के खिलाडी १५’ मध्ये ‘या’ १२ सेलिब्रिटींची एन्ट्री Top 10 News : खतरों के खिलाडी १५ हा शो लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या शोची जोरदार चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाची थीमदेखील उघड करण्यात आली आहे. यावेळी याला “डर का नया दौर” असे नाव देण्यात आलंय. या कार्यक्रमातील निश्चित स्पर्धकांची यादीही जाहीर करण्यात आली असून, यामध्ये जुन्या स्पर्धकांसह अनेक नव्या चेहऱ्यांची एन्ट्री होणार आहे. खतरों के खिलाडी १५ च्या प्रसिद्धीसाठी खास एक नवीन इंस्टाग्राम पेज तयार करण्यात आले आहे. या पेजवर, या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची माहिती देण्यात आलीय. यामध्ये करण वाही,गौरव खन्ना, ऋत्विक धनजानी,विशाल आदित्य सिंग,फरहाना भट्ट,ओरी,रुबिना दिलैकसह आणखी ५ स्पर्धकांचा समावेश असल्याचं म्हटलं जातंय.