1. Top 10 news : राज्यातील 14 हजार 237 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणार एकीकडे राज्यातील आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुका लांबणीवर गेल्या. तर आता कार्यकाळ संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर जाणार आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायती असून राज्यातील 14237 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ येत्या वर्षात संपणार आहे. जानेवारी 2026 पासून डिसेंबर 2026 पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकनेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढलेत. यावर 14 ऑगस्ट 2020च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती होणार आहे. तसे आदेश ग्रामविकास विभागाचे अपर सचिवांनी काढले असून जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश धडकलेत. 2. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय Top 10 news : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार करणार नाही अशी माहिती समोर आलीय. अजितदादांच्या निधनानंतर पुण राष्ट्रवादीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी या निवडणुकीत प्रचार आणि रोड शो करणार नाहीत. मतदारांना फक्त पत्रके वाटून प्रचार करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कुठल्याही प्रचार सभा आणि रोड शो घेतले जाणार नाहीत. उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असं आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. निवडून आल्यांनतर देखील कुठलीही मिरवणूक काढली जाणार नाही असं सांगण्यात आलंय. 3. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवली महापालिका महापौर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. त्यात उल्हासनगर महापालिका महापौर नागरिकांचा मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी राखीव असून कोण होणार महापौर? याची उल्हासनगर महापालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे. शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक असून महापौर पद टीम ओमी कलानीकडे जाणार असल्याची चर्चा उल्हासनगर शहरात रंगली आहे. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिकामध्ये महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचे असल्याने एकमेव शिवसेना शिंदे गटाकडे दोन नगरसेवक असल्याने कोणाला महापौर पदावर विराजमान केले जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागलय. 4. निवडणूक अन् CTET परीक्षा एकाच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या बदललेल्या वेळापत्रकामुळे शिक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षकांची सीटीईटी (CTET) परीक्षा ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, आता निवडणुका पुढे ढकल्याने इलेक्शन ड्युटी करुन दुसऱ्या दिवशी पेपर कसा द्यायचा? दुसऱ्या दिवशी सीटीईटी साडेआठ वाजता सेंटरवर हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. तर मग सेंटरवर पोहोचायचे कधी आणि पेपर दुसऱ्या दिवशी द्यायचा कधी हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. 5. पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे आज वयाच्या ७६ व्या वर्षी पहाटे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. शरद पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्षपद भूषवले होते.‘‘पुणे शहराचे दुसरे सार्वजनिक काका अशी शांतिलाल सुरतवाला यांची ओळख होती. ते गणेश मंडळाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ता होते. सर्वसामान्यांचे दुःख त्यांना माहिती होते. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात यशस्वी वाटचाल केली. ‘गणेश मंडळाचा कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर अशी अनेक पदे शांतिलाल सुरतवाला यांनी भूषविली. 6. अकोल्यात महापौरपदासाठी शेवटपर्यंत रस्सीखेच अकोल्यात महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजप वगळता इतर पक्षांच्या बैठकीचे सत्र सुरू आहे. त्यामध्ये काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, AIMIM पक्षाचे सर्व नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष सहभागी झाले होते. या बैठकीला अपक्ष नगरसेवकांसह काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदारही उपस्थित होते. आज होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानं आपलं संख्याबळ 44 वर पोहोचल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतोय. भाजपकड स्पष्ट बहुमत असल्याचा विश्वास व्यक्त करत शहर सुधार आघाडीच्या नगरसेवकांनी गटाची नोंदणी केलीय. अकोल्यात बहुमतासाठी 41 नगरसेवकांची गरज आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही सत्ता आमचीच येणार, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येतोय. 7. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार ? Top 10 news : जानेवारी महिना संपत आला आहे. पुढच्या महिन्यात अनेक गोष्टी बदलणार आहेत. त्याआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीआधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे हा हप्ता येण्यास उशिर होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेचा हप्ता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यासाठी कोणतीही पाऊले उचलण्यात आल्याचे दिसत नाहीये. यामुळे जानेवारीचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 8. राज्यातील सहा जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशभरातील हवामानात बदल जाणवत आहे. याबाबत, भारतीय हवामान विभागानं अनेक राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आलाय. राज्याच्या विविध भागांत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू असून, आज किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी, तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’देण्यात आलाय. या भागांत हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. 9. “मूड ऑफ द नेशन”सर्वेतही भाजपची सरशी जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागांची संख्या 352 पर्यंत वाढेल. शिवाय, भाजपची संख्या देखील 287 पर्यंत वाढेल. हे निकाल इंडिया टुडे-सी व्होटरच्या “मूड ऑफ द नेशन”सर्वेक्षणावर आधारित आहेत. “मूड ऑफ द नेशन” सर्वेक्षणात विचारण्यात आले होते की, जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर निकाल काय लागेल आणि प्रत्येक आघाडी किती जागा जिंकेल? सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की NDA ला 352 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर INDIA Block ला 182 जागा मिळू शकतात, तर इतरांना 9 जागा मिळू शकतात. तर प्रत्येक पक्ष किती जागा जिंकेल असा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. या सर्वेक्षणात भाजपला २८७, काँग्रेसला ८० आणि इतरांना १७६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. 10. कॅनडावर ५०% कर लादण्याची ट्रम्पची धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाविरुद्ध कठोर भूमिका घेतलीय, त्यांनी विमान वाहतूक क्षेत्रात एक मोठे आणि आक्रमक पाऊल उचलण्याची घोषणा केलीय. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी कॅनडावर अमेरिकन विमान उत्पादक कंपनी गल्फस्ट्रीमसोबत भेदभाव केल्याचा आरोप केला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची भीती निर्माण झालीय. तसेच जर कॅनडाने तातडीने यावर काही तोडगा काढला नाही तर कॅनडामधून आयात होणाऱ्या सर्व विमानांवर ५० टक्के कर लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली. या विधानामुळे अमेरिका आणि कॅनडामधील व्यापारी संबंध आणखी ताणले जाण्याची अपेक्षा आहे.