Today TOP 10 News: लाडक्या बहिणींच्या शंकाचे एका कॉलवर होणार निरासन लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना केवायसी करुनही त्यांच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे जमा झाले नाहीत. यावर आता राज्य सरकारने यावर तोडगा काढला आहे. महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानंतर आता आदिती तटकरेंनी मोठी घोषणा करत लाडकी बहीण योजनेतील लाभार्थंच्या सुविधेसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आल्याचे सांगितले आहे. या योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार असून, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घेण्याची विनंती आदिती तटकरेंनी ट्वीटद्वारे केली आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये सर्वाधिक चुरस महापालिका निवडणुकीत तब्बल ११९ जागा निवडून आल्याने भाजपचा एकहाती सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता पालिकेत भाजपच्या स्वीकृत सदस्य संख्या ७ असणार आहे. तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे २ आणि काॅग्रेसचा एक स्वीकृत नगरसेवक असणार आहे. या जागांसाठी भाजपमध्ये चुरस असून त्यासाठी तब्बल ५१ जणांची यादी पक्षाने तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एका जागेसाठी पक्षाकडे जवळपास ७ ते ८ जण इच्छूक असल्याचे चित्र आहे. महापालिकेत यंदा १६५ सदस्य असणार आहे. ठाकरे गटाचे ४ नगरसेवक नॉट-रिचेबल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक अचानक नॉट-रिचेबल झाल्याने थेट पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी चार नगरसेवक सध्या नॉट-रिचेबल आहेत. यातील मधुर उमेश म्हात्रे आणि कीर्ती राजन डोणे हे दोन नगरसेवक 16 जानेवारीपासून संपर्काबाहेर असल्याने कल्याण पूर्व जिल्हाप्रमुख शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर संशय व्यक्त होत असून निष्पक्ष तपासाची मागणी केली जात आहे. हेही वाचा: Pune Crime : पोलिसानेच चोरले १० कोटींचे ड्रग्ज; शिरूरमधील ‘त्या’ गॅरेजचालकाने उघडलं गुपित..वाचा सविस्तर अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता १ फेब्रुवारी रोजी देशाचा २०२६-२७ साठी अर्थसंकल्प सादर होणार आहे. या नवीन अर्थसंकल्पानंतर जुनी टॅक्स प्रणाली पूर्णपणे बंद होणार आहे. तर नवीन टॅक्स प्रणाली अजूनच चांगली करण्यासाठी सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. दरम्यान, आता नवीन अर्थसंकल्पामध्ये स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे करदात्यांना फायदा होऊ शकतो. Today TOP 10 News | “आज ही परिस्थिती पाहायला बाळासाहेब नाहीत ही चांगली गोष्ट” बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळला दिला. तसेच सध्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले की, “आज गुलामांचा बाजार झाला आहे. हे सर्व महाराष्ट्रातील चित्र पाहिल्यानंतर आज मला वाटतं की बाळासाहेब नाहीत ते बरं आहे. पूर्वी दोनशे वर्षापूर्वी चावडीवर उभं राहून माणसांचे लिलाव चालायचे. आजही ते लिलाव सुरू आहेत, कल्याण डोंबिवली ठाणे अशा अनेक ठिकाणी हे सर्व सुरू आहे.” नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात असताना सरकार शांत – राहुल गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकन टॅरिफमुळे भारतीय वस्त्रोद्योगाला होत असलेल्या नुकसानाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ‘भारतातील वस्त्रोद्योग हा रोजगार निर्मितीच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठे क्षेत्र आहे. भारतीय कपड्यांना जगभर मागणी आहे आणि आपल्या कारागिरांच्या कौशल्याला तोड नाही. मात्र, अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे या क्षेत्रात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी ना कोणतीही सवलत दिली आहे, ना टॅरिफवर चर्चा केली आहे. साडेचार कोटींहून अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात असताना सरकार शांत आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. Today TOP 10 News स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ‘तीर्थाटन’ योजना सुरू स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एसटी संगे तीर्थाटन योजना सुरू करण्यात येत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल, अशा दरात धार्मिक पर्यटन करता येणार असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ही योजना ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित असून, त्यामध्ये सर्व सवलती, योजना जशाच्या तशा लागू राहणार आहेत. २३ जानेवारी २०२६ पासून ही योजना राज्यातील २५१ आगारांत एकाच वेळी राबविण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराजांचा ४१८ वा जन्मोत्सव सोहळा संपन्न जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा ४१८ वा जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वैकुंठगमन (गोपाळपुरा) परिसरात माघ शुद्ध वसंत पंचमीच्या दिवशी कीर्तनाने या सप्ताहाची सांगता झाली. जन्मोत्सवानिमित्त चैतन्य प्राणायाम, ब्रह्मनाद योग साधना, हरिपाठ, गाथा पारायण, भजन, कीर्तन, जागर अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारत मोठा धमाका करत देणार ट्रम्प यांना देणार धक्का भारतासाठी जागतिक बाजारातून दिलासा देणारी माहिती समोर आली. भारत आणि EU युरोपिय संघामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मुक्त व्यापार कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कराराची घोषणा 27 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या भारत युरोपियन संघांच्या शिखर परिषदेमध्ये होऊ शकते. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी भारत आणि युरोपियन संघामध्ये होणाऱ्या या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं आहे. हा सामंजस्य करार अस्तित्वात आल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकूण जीडीपीच्या 25 टक्के भागाशी थेट जोडला जाणार आहे आणि हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. Today TOP 10 News | अभिनेता कमाल आर खानला अटक ओशिवारा गोळीबार प्रकरणात अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके याला पोलिसांनी अटक केली आहे. कमाल खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं आहे की, गोळीबार त्याच्याच शस्त्रातून झाला आहे. मात्र हे शस्त्र परवानाधारक असल्याचं खानचं म्हणणं आहे. पोलीस सध्या या दाव्याची पडताळणी करत असून संशयास्पद शस्त्र जप्त करण्यात आलं आहे. या शस्त्राशी संबंधित कागदपत्रांचीही कसून तपासणी सुरू आहे. दरम्यान, कमाल खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार असून, तिथे पोलीस त्याच्या कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. Today TOP 10 News | हेही वाचा: Donald Trump hand blue spot: डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातावरील जखमेमागचं सत्य काय? व्हाईट हाऊसची मोठी हेल्थ अपडेट