Drowning News : करूळ जामदारवाडी धरण परिसरात घडलेल्या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरले आहे. उन्हाळी सुट्टीसाठी मामाच्या गावी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. (Drowning News) मृत मुलींची नावे तन्वी अनंत माळकर (१६), स्वरा संदीप सुर्वे (११) आणि ऋतिका संतोष पाटील (१४) अशी आहेत. यापैकी दोघी मुली करूळ भोयडेवाडी येथील तर एक मुलगी कुसूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. (Drowning News) मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास सहा जणांचा गट जामदारवाडी धरणावर अंघोळीसाठी गेला होता. यामध्ये चार मुली आणि दोन तरुणांचा समावेश होता. (Drowning News) पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही मुली खोल पाण्यात गेल्या आणि बुडू लागल्या. सोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. (Drowning News) घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी धरण परिसरात धाव घेतली. एकाचवेळी तीन मुलींचा मृत्यू झाल्याने करूळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. (Drowning News)