BMC Election | राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या यात मुंबई महापालिकेचाही समावेश असून, सर्वच राजकीय प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीची घोषणा होताच रात्री ठाकरे बंधुविरोधात मुंबईमध्ये बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स कुणी लावले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानेच ठाकरे बंधुंना लक्ष्य करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईत ठाकरेंविरोधात ठीकठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहे. बॅनर्सवर “जे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसांचे काय होणार! मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नांदी लागू नको. मुंबईचा रंग बदलू देऊ नको”, असेही म्हटले गेले आहे. त्याचबरोबर “बृहन्मुंबई महापालिका हा काही कौटुंबिक व्यवसाय नाहीये”, असे म्हणत ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. बॅनरबाजी करत शिवसेना ठाकरे गटासह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भूमिका देखील महत्वाची असणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीचा घटकपक्ष असला, तरी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत बोलणी सुरू आहे. BMC Election | निवडणुका अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या आता या निवडणुका अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची घोषणा दोन दिवसांमध्ये केली जाऊ शकते, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू विरुद्ध भाजप आणि शिंदेंची शिवसेना अशी लढाई होण्याचा अंदाज आहे. BMC Election | 15 जानेवारी 2026 रोजी मतदान दरम्यान, बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. BMC Election | हेही वाचा: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने! फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले…