Prime Minister Narendra Modi | राज्यभरात प्रचंड राजकीय प्रतिष्ठेच्या बनलेल्या, अत्यंत चुरशीने लढवल्या गेलेल्या २९ महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. त्यामुळे राज्याच्या राजकारणावरील सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. विशेषत: सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले. प्रमुख शहरांचा कारभार हाती येणार असल्याने महापालिका निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले. मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. कारण गेल्या तीन दशकांपासून ठाकरेंच्या शिवसेनेची इथे सत्ता होती. दुसरीकडे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला सर्वात मोठं यश मिळालं आहे. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांची युती होऊनही त्यांना यश मिळालं नाही. या महापालिका निकालांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. Prime Minister Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? “महाराष्ट्राचे आभार! राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी निकालावर दिली आहे. Prime Minister Narendra Modi | “महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे. त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना, आगामी काळासाठीचा आमचा दृष्टीकोण ही अधोरेखित केला आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा”, अशा शब्दांत मोदींनी कार्यकर्त्यांचेही मनोबल वाढवले आहे. Prime Minister Narendra Modi | हेही वाचा: पुणे निकालानंतर अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला; पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?