Ritu Tawde and Sanjay Ghadi : अखेर आज मुंबई महापालिकेसाठी महायुतीच्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपकडून रितू तावडे (Ritu Tawde) यांना महापौर तर शिवसेनेकडून संजय घाडी (Sanjay Ghadi )यांना उपमहापौर पदासाठी संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पदांसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. महापौर पदासाठी भाजपकडून अनेक महिला नेत्यांची नावे आघाडीवर होती. पण पक्षाने रितू तावडे यांना संधी दिली. आज ७ फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. ११ फेब्रुवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये नगरसेवक मतदान करून महापौर आणि उपमहापौर निवडतील. कोण आहेत रितू तावडे? रितू तावडे या भारतीय जनता पक्षच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेविका आहेत. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. हा मतदारसंघ गुजराती बहुल आहे, पण त्या स्वतः मराठा समाजातील असून एक आक्रमक आणि खंबीर मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. राजकीय प्रवास रितू तावडे या २०१२ मध्ये प्रभाग १२७ मधून पहिल्यांदा निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये प्रभाग १२१ मधून विजय. २०२५/२०२६ च्या BMC निवडणुकीत प्रभाग १३२ मधून सलग तिसऱ्यांदा विजयी. BMC च्या शिक्षण समितीचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे. त्या भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. संजय घाडी कोण आहेत? संजय घाडी हे शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते आणि मुंबई महानगरपालिकाचे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. दहिसर मगाठाणे वॉर्ड क्रमांक ५ चे नगरसेवक आहेत. २०१७ आणि २०२६ मध्ये निवडून आले आहेत. राजकीय प्रवास: १९८८ पासून शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेत (BVS) विभागप्रमुख म्हणून सुरुवात.१९९०-९१ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य. एकेकाळी राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आणि सहकारी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मध्ये राज्य सरचिटणीस राहिले आहेत. तसेच मनसेकडून निवडणूकही लढवली. नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश, तिथे नगरसेवक झाले. २०२५ एप्रिल मध्ये पत्नीसह उद्धव गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश. सध्या ते शिवसेना पक्षाचे उपनेता, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आहेत. हेही वाचा : Uttar Pradesh accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण रस्ता अपघात ; रस्त्याकडेला उतरलेल्या १५ प्रवाशांना धडक, ६ जणांचा मृत्यू