Kisan Gawande | राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. अनेक निष्ठावंत मंडळींना एबी फॉर्म दिल्याने काहींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. यादरम्यान अनेक पक्षांत बंडखोर करण्यात आली असून बंडोबांना थंड करण्याचे काम सुरू झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नेते, पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागली आहे. याचदरम्यान आता नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आतापर्यंत अनेक ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून रडारड सुरू असल्याचे पाहायला मिळाले. मात्र नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये म्हणून उमेदवाराला समर्थकांनी चक्क घरातच बंद करून ठेवले. नागपूरमध्ये अपक्ष उमेदवाराला त्याच्या प्रभागातील लोकांनी त्याच्या राहत्या घरातच बंद केलं, एवढंच नव्हे तर त्याच्या घराला बाहेरून कुलूपही लावलं. ‘उमेदवारी अर्ज मागे घेऊ नका, आम्हाला तुम्ही हवे आहेत, उमेदवारी मागे घ्यायची नाही’, असं म्हणत लोकांनी त्यांना बाहेर काढण्यास नकार दिला. Kisan Gawande | नेमकं काय घडलं ? किसान गावडे यांना नागपुरच्या प्रभाग क्रमांक 13 मधून भारतीय जनता पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता, पण त्यांचा एबी फॉर्म रद्द झाला. त्यानंतर किसन गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण भाजपने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून भाजपच्या निर्देशानंतर किसन गावडे हे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी निघाले होते. Kisan Gawande | मात्र अनेक नागरिकांनी त्यांना विरोध केला आणि त्यांच्या दाराला थेट कुलूप लावत गावडे यांना घरातच बंद केलं. दुसरीकडे, गावंडे हे कार्यकर्त्यांची समजूत घालत आहे. ‘मी फॉर्म मागे घेण्यासाठी जाणार आहे, पण हे कार्यकर्ते, समर्थक मला जाऊ देत नाही. मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान करतो, ‘असं गावंडे म्हणाले. Kisan Gawande | हेही वाचा: “बिहारमध्ये २५ हजारात मुली मिळतात” ; मंत्री रेखा आर्य यांच्या पतीचे वादग्रस्त विधान