Vijay Wadettiwar : महाराष्ट्रात सध्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक आणि हादरुन टाकणारी माहिती समोर येत आहे. काल 24 मार्च 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली. सुनावणीत खरातच्या पोलिस कोठीडीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनचा शेवटचा दिवस असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सनसनाटी दावा केला आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू असून, प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने पोलिसांकडून विविध गोष्टी पडताळून पाहिल्या जात आहेत. पोलिसांनी ज्यावेळी अशोक खरात याला अटक केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत असताना महत्वाची कागदपत्रे, दोन लॅपटॅाप आणि पेनड्राइव्ह जप्त केले होते. याविषयी बोलताना विजय वडेट्वीवार म्हणाले, “लॅपटॅाप जप्त केल्याचे सांगत आहेत, मग पेन डाईव्ह कुठे आहे? ते आणला तर मग सगळे उघडे होतील. मंत्रीमंडळातील दोन तीन लोकांची विकेट जाईल,” असा सनसनाटी दावा विजय वडेड्डीवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुरावा संपवण्यासाठी खरातचा एन्टाकाऊट होईल, असाही धक्कादायक दावा त्यांनी केला आहे. चौकशीतून काय समोर येईल असे वाटत नाही: वडेट्टीवार सत्तेतमध्ये सहभागी असेलल्या लोकांना मुख्यमंत्री वाचवणार असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाामध्ये आयपीस अधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले आहेत. त्यामुळे एसआयटी चौकशीतून पुढे काय येईल असे वाटत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले आहेत. हेही वाचा : US Israel Iran War : इस्रायल लेबनॉनच्या १० टक्के भूभागावर कब्जा करणार ; इस्रायली संरक्षण मंत्र्यांचा मोठा दावा