Mohan Bhagwat : “रिकामं डोकं सैतानाचे घर बनते, त्यामुळे हाताला काम पाहिजे. काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील”, असे प्ररखड मत रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘संघ प्रवासाची 100 वर्षे: नवे क्षितिज’ या विषयावर सरसंघचालक मोहन भागवतांची दोन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मान्यवरांसोबत प्रश्न-उत्तरांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. एआय आणि नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगार जाणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. तंत्रज्ञानाला नाकारायला नको. आपल्याकडे हात आहेत, त्या हातांना काम हवंय. रिकामं डोकं सैतानाचे घर बनते, त्यामुळे हाताला काम पाहिजे. काम नसेल तर तरुण नक्षलवादाकडे वळतील. भष्ट्राचार आणि भाषेच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याच्या प्रश्नावर देखील मोहन भागवत यांनी आपले विचार मांडले. भ्रष्टाचार दूर कसा करायचा? भाषेच्या आधारावर भेदभाव केला जात आहे तो कसा दूर करायचा? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले, “भाषिक वाद मिटवयाचे असतील तर एकमेकांच्या घरी गेलं पाहिजे. सुख दुःखात सहभागी झालं पाहिजे. ज्यावेळी देशाचा विषय येईल, त्यावेळी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.” असे मत मांडले. ते असेही म्हणाले की, भ्रष्टाचारी समोर आणायला संघ प्रयत्न करेल. भ्रष्टाचार व्यवस्थेत नाही तर मनात होत असतो. व्यवस्थेला बिघडवणारे आणि सुधरवणारे आपणच आहोत. भाषेच्या आधारावर समाजात भेदभाव नाही. काहींकडून हे होतं, असा दावा त्यांनी केला आहे. हेही वाचा : Sanjay Raut : मुंबईतील बांगलादेशी रोहिंग्यांना बाहेर काढणार; रितू तावडेंचा इशारा, आता संजय राऊत म्हणाले….