Ashok Kharat case : राज्यात सध्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत एसआयटी स्थापन केली आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरात प्रकरणावरुन विरोधकांकाडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकरांवर आरोप केले जात असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याशिवाय खरात याच्याकडे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांचाही राबता असल्याचा असा आरोप होत आहे. अशातच या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केले आहे. Ashok Kharat case “महाराष्ट्राच्या राजकारणात अशोक खरात हे प्रकरण एपिस्टीन फाईल आहे. पोलिसांनी जो पेन ड्राईव्ह जप्त केला आहे. त्यात 58 व्हि़डिओ आहेत. हे व्हिडिओ जर पोलिसांनी बाहेर काढले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, कारण यामध्ये भाजपचे मोठे नेते आहेत,” असे मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. हेही वाचा : Goa CM Pramod Sawant : अचानक छातीत दुखू लागलं अन्…; गोव्याचे मुख्यमंत्री डॅा. प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया अशोक खरात याच्याविरुद्ध महिलांचे लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्याच्यावर महाराष्ट्र जादूटोणा काद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर अशोक खरात याचे काळे कारनामे समोर आले आहेत. बुधवार 18 मार्च रोजी अशोक खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर जिवंत काडतुसासंह पिस्तुल मिळाले आहेत. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोट्यावधींची माया Ashok Kharat case महिलांचा विश्वास संपादन करून भोंदूबाबा अशोक खरात याने कोट्यावधींची माया जमवली आहे. हा आकडा धक्कादायक आहे. तब्बल 200 कोटींच्या जवळ त्याची संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये नाशिक शहरातील पाथर्डी येथे सुमारे 150 कोटींची जमीन आहे. सिन्नरमधील मिरगाव येथे त्यांची कोट्यवधीची जमीन, फार्महाऊस आहे. याच गावात 10 कोटी रुपये खर्चून ते मंदिर बांधत आहेत. विमानतळाशेजारी देखील त्याने कोट्यवधीची जमीन घेऊन ठेवली आहे. राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल Ashok Kharat case Ashok Kharat case News अशोक खरात याला अटक केल्यानंतर एसआयटीकडून त्याची कसून चौकशी केली जात असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. यामुळे त्याचे नेत्यांसोबत राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाली आहे. चाकणकरांवर आरोप या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एका स्थानिक वृत्तपत्राने खरातच्या विरोधात बातमी केली होती, तेव्हा चाकणकर यांनी संबंधित वृत्तपत्रकाच्या संपादकाला धमकी दिली होती. असाही आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आला आहे. हेही वाचा : Top 10 News : रुपाली पाटील-ठोंबरेंच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ, भारत आता रशियाकडून LPG खरेदी करणार, वाचा अशा टॉप १० बातम्या