ZP Election | नगरपरिषदा, महापालिका निवडणुकीतील बिनविरोधचा फंडा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गातील वैभाववाडीमध्ये भाजपने आपले खातं उघडलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बिनविरोध निवड ठरली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने कोकीसरे मतदारसंघातून साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या या पत्नी आहेत. ZP Election | इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवला नाही दरम्यान, कोकिसरे मतदारसंघातून भाजपतर्फे साधना सुधीर नकाशे यांनी दोन अर्ज भरले होते, तर अक्षता सूर्यकांत डाफळे यांनी भाजपचा डमी अर्ज सादर केला होता. मात्र या मतदारसंघातून ठाकरे सेना, मनसे किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही. इतर कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्षाचा अर्ज न आल्याने नकाशे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या विजयानंतर वैभववाडीतील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. ZP Election | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद ( ZP Election) आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधून जिल्हा परिषदेसाठी २७३, तर पंचायत समितीसाठी ४४० असे एकूण ७१३ उमेदवारी अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. हेही वाचा: Supreme Court on EC : ” तुम्ही बेलगाम घोड्यासारखे वागू शकत नाही…” ; SIR प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले