Municipal Election Result | राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. निकालानंतर आता राज्याच्या राजकारणावरील सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. विशेषत: सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले. प्रमुख शहरांचा कारभार हाती येणार असल्याने महापालिका निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. मात्र आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता परंतु आरक्षण सोडत निघाल्यानंतरच महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. पुढील आठवड्यात नगर विकास खाते महापौर सोडत काढणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तर जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील निवडणुकीच्या इतिहासात महापौर आरक्षणाची सोडत न होता निवडणूक होण्याची ही पहिलीच वेळ होती. साधारणपणे महापालिका निवडणुकांपूर्वी किंवा प्रभाग रचनेदरम्यानच महापौरपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. यामुळे कोणत्या प्रवर्गातील उमेदवाराला संधी मिळेल, हे स्पष्ट होत असे. मात्र, यावेळी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र हे आरक्षण पडण्यासाठी किमान दोन ते तीन आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात तिढा दरम्यान, महापौरपदासाठी सोडतमधून आरक्षण निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरूष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती व जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते. आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजे आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्चपद भूषविण्याची संधी मिळेल. Municipal Election Result | महापौरपदाचे आरक्षण जाहीर न होण्यामागे ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात असलेला तिढा हे कारण प्रशासनाकडून दिले जात आहे. जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत आरक्षण निश्चित करणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. Municipal Election Result | राज्यातील २९ महानगर पालिकांमध्ये कोणाच्या किती जागा? भाजप – १४२५ शिवसेना (शिंदे) – ३९९ काँग्रेस – ३२४ राष्ट्रवादी अजित पवार गट – १६७ शिवसेना ठाकरे गट – १५५ राष्ट्रवादी शरद पवार गट – ३६ मनसे – १३ बहुजन समाजवादी पार्टी -६ एमआयएमचे – १२५ हेही वाचा: दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र ! जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत एकत्र लढणार