Asha Bhosle Funeral : सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातत्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचं पार्थिव सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संगीत क्षेत्र, चित्रपटसृष्टी, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो चाहते आशाताईंना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. Asha Bhosle Funeral त्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आशाताईंचे अंत्यदर्शन घेतले, यावेळी मंत्री आशिष शेलार देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी देखील आशा भोसले यांच्या निवासस्थानी पोहोचत त्यांचे अंत्यदर्शन घेतले. Asha Bhosle Funeral Raj Thackeray केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यासह अभिनेता जॅकी श्रॉफ हेही आशा भोसलेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी निवासस्थानी आल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय बॉलीवूडमधील अनेक कलाकार मंडळी आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी आली होती. आशा भोसले संगीतातील विविध प्रयोगांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी 20 हून अधिक भाषांमध्ये तब्बल 12 हजारांहून अधिक गाणी गायली. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. Asha Bhosle Funeral सिनेसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील त्यांच्या अजोड योगदानाची दखल घेऊन, त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक फिल्मफेअर पुरस्कारांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. हेही वाचा: Teacher Training : शिक्षकांनो तयार व्हा! मे महिन्याच्या सुटीत मिळणार ‘या’ वर्गांच्या नव्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण