Anmol Bishnoi | कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोईबाबत गृह मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला मागच्या महिन्यात अमेरिकेतून प्रत्यार्पण करुन भारतात आणण्यात आलं. अनमोल बिश्नोई कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोईचा एक वर्षापर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नाही. गृह मंत्रालयाने कोणत्याही पोलीस किंवा तपास संस्थेला गँगस्टर अनमोल बिश्नोईचा 1 वर्षासाठी ताबा घेण्यास मनाई केली आहे. केंद्रीय मंत्रालयाच्या आदेशानुसार, आता कोणत्याही राज्य पोलीस दलाला किंवा एजन्सीला बिश्नोईची चौकशी करायची असल्यास त्यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगाच्या आवारातच त्याची चौकशी करावी लागेल. म्हणजेच मुंबई किंवा पंजाब पोलीसांना त्याची चौकशी करायची असल्यास त्याला ताब्यात घेऊ शकत नाहीत. सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय जारी अनमोल बिश्नोईकडून आता १ वर्षाच्या आत ज्या कोणत्याही राज्याच्या पोलीस किंवा एजन्सीला चौकशी करायची असेल, त्यांना तिहाड तुरुंगात येऊन चौकशी करावी लागेल. हा आदेश सुरक्षेच्या कारणास्तव जारी करण्यात आला आहे. याआधी अनमोलच्या भावावर लॉरेन्स बिश्नोईवरही गृह मंत्रालयाचा हाच आदेश लागू आहे. अनमोल बिश्नोई हा बाबा सिद्दीकी खून प्रकरण आणि अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेरील झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील प्रमुख आरोपी आहे. Anmol Bishnoi | 2022 पासून पळ काढत घेतला अमेरिकेत आश्रय दरम्यान, १९ नोव्हेंबरला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ आणि जवळचा सहकारी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून डिपोर्टेशनवर भारतात पोहोचताच अटक करण्यात आली होती. अनमोल २०२२ पासून फरार होता आणि NIAच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत समाविष्ट होता. त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एनआयएच्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई 2022 पासून पळ काढत होता आणि अमेरिकेत आश्रय घेत होता. संस्थेने 2023 मध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याला प्रमुख संशयितांपैकी एक म्हणून नमूद केले होते. वांद्रयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची त्यांच्या कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली होती. या शूटर्सना लॉरेन्स बिश्नोई गँगने पाठवलं होतं. याशिवाय त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. Anmol Bishnoi | हेही वाचा : पाकिस्तानला पुतिन यांनी दाखवली जागा, शहबाज शरीफ भेट घेण्यासाठी आले पण घडलं भलतचं