Raj And Uddhav Thackeray | मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची चर्चा सुरू होती. मराठी विजय मेळावा आणि त्यानंतरच्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा कधी करणार? याची प्रतीक्षा अनेकांना होती. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त जाहीर केला. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. ठाकरे बंधूंनी शक्तिप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळास अभिवादन करणार ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्यापूर्वी शिवाजी पार्कात जाणार आहेत. शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळास अभिवादन करणार आहेत. या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्यासाठी रवाना होतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील. ठाकरे बंधूंची रणनीती तयार? मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही रणनीती आखली आहे. मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबईसह सहा महापालिकांमध्ये एकत्रित लढणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर यांसह ठिकठिकाणी ठाकरे बंधूंची युती होणार आहे. मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पुणे, नाशिक आणि इतर महत्त्वाच्या महापालिकांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही रणनीती आखली आहे. Raj And Uddhav Thackeray | या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाचे आणखी एक खास समोर युतीची घोषणा करण्यासाठी वरळी सी फेस येथील हॉटेल ब्ल्यु सी या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी २०१९ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा याच हॉटेलमध्ये झाली होती. आज त्याच जागी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. Raj And Uddhav Thackeray | हेही वाचा: Pimpri : अजित पवारांचा भाजप अन् शरद पवार गटाला धक्का