Sanjay Raut | मुंबईसह २९ महापालिका निवडणुकींच्या तयारीला सुरूवात झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकीकडे राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या युती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. सध्या ठाकरे बंधुच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असून नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. संजय राऊत म्हणाले की, मनसे आणि शिवसेना युतीबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नसून, कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेल्या आहेत. कार्यकर्त्यांमधील मनोमिलन आम्ही स्वतः अनुभवत आहोत. ठाकरे बंधूंमध्ये युती झालेलीच आहे. जागा वाटपावर शेवटचा हात काल रात्री फिरला. आता राज आणि उद्धव ठाकरे यांनी जागावाटप आणि अन्य संदर्भात केवळ घोषणा करणे बाकी आहे. घोषणा कधी करायची याबाबत आम्ही निर्णय घेऊ,” असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर येथेही जागावाटपाची चर्चा पूर्ण झालेली आहे. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेतला जाईल, आता या सर्व गोष्टी जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. मी आता थोड्यावेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी बोलून आम्ही निर्णय घेऊ. एबी फॉर्मचेही वाटप झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. Sanjay Raut | दोन्ही पक्ष मनापासून एकत्र पुढे ते म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच आम्ही सगळे एकमेकांच्या संवादात आहोत. आमचे जागावाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेले आहे. निष्ठावान लोकांची उमेदवारी कापून गद्दारांना त्या जागा द्याव्यात, एवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही. जागावाटप झाल्याशिवाय कोणतीही युती जाहीर होत नाही. आमच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आम्ही दोन्ही पक्ष मनापासून एकत्र आहोत. दोन्ही पक्षात जागावाटपावरून कोणताही तणाव, रस्सीखेच, विसंवाद नाही. दोन्ही पक्षांमध्ये एका कोणत्या जागेसाठी कोणी अडून बसले आहेत, असे अजिबात झालेले नाही, असे संजय राऊत यांनी ठामपणे सांगितले. महाविकास आघाडी तुटलेली नाही यावेळी त्यांनी महाविकास आघाडी तुटलेली नसल्याचे देखील स्पष्ट केले. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही निर्णय घ्यावे लागतात. शिवसेना आणि मनसे युती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तेव्हा आम्ही १००चा आकडा १०० टक्के पार करू, असा मोठा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला. Sanjay Raut | दरम्यान, वरळी येथे दोन भाऊ एकत्र आले, तेथेच युतीची घोषणा झाली. घोषणेबाबत अन्य कुणी चिंता करू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. Sanjay Raut | हेही वाचा : Winter Health: सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय: औषधी वाफ घेण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग