Thane Municipal Corporation । ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं, त्यानंतर आज निवडणुकीचा निकाल समोर येत आहेत. राज्यातील इतर महापालिका निवडणुकींपैकी ठाणे महापालिकेची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार? याची उत्सुकता सर्वच पक्षांना लागली आहे. दरम्यान, याचे उत्तर हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. याठिकाणी ३३ प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने झाली, याठिकाणी १ ते २८ आणि ३० ते ३३ प्रभागांमध्ये अ,ब,क,ड अशा चार जागांकरीता तसेच प्रभाग क्रमांक २९ मध्ये अ,ब,क अशा ३ जागांकरिता मतदारांनी मतदान केले. महापालिका क्षेत्रात एकूण २ हजार १३ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. ठाणे महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे सह उमेदवार बिनविरोध Thane Municipal Corporation । ठाणे महानगरपालिकेत उमेदवारांच्या अर्ज छानणी वेळी आघाडीच्या उमेदवारांचे काही अर्ज बाद झाले. तर, काही उमेदवारांनी अचानक माघार घेतली. त्यानंतर, अपक्षांनी देखील तेथील जागांवरून अर्ज मागे किंवा त्यांचे अर्ज बाद झाल्याने ठाणे शहरात शिंदे गटाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण ३३ प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले होते. या प्रभागांमधून १३१ नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक पार पडेल असे ठाणे महापालिकेने जाहीर केले होते. परंतू, बिनविरोध निवडींमुळे १३१ पैकी केवळ १२५ जागांसाठी निवडणूक झाली. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत ठाणे महानगरपालिकेवर शिवसेना पक्षाचे वर्चस्व होते. या वर्षी शिवसेनेने १३१ पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या.तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रस पक्ष ३५ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. भाजपाला २३ आणि काँग्रेसला ३ जागा मिळाल्या होत्या. एमआयएम २ आणि अपक्ष उमेदवारांना १ जागा जिंकता आली होती. Thane Municipal Corporation ।