Terrorists Arrested | पंजाबच्या होशियारपूरमध्ये पोलिसांनी पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ समर्थित संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात २.५ किलो आरडीएक्सने भरलेले आयईडी देखील जप्त करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day ) कार्यक्रमांना लक्ष करून मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी या आयईडीचा वापर केला जाणार होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे होशियारपूर पोलीस आणि सीआय जालंधरच्या पथकांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. Terrorists Arrested | Maharashtra Election News: सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र, राजकीय वर्तुळात खळबळ याबाबत पोलीस महासंचालक (DGP) गौरव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची दिलजोत सिंह, हरमन सिंह उर्फ हॅरी, अजय उर्फ माहिरा आणि अर्शदीप सिंह उर्फ अर्श कंडोला अशी नावं आहेत. Terrorists Arrested हे सर्वजण एसबीएस नगर जिल्ह्यातील राहों भागातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून स्फोटकांव्यतिरिक्त दोन पिस्तूलही जप्त केली आहेत. पोलीस सध्या या चारही दहशतवाद्यांची कसून चौकशी करत असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा दहशतवादी कट उधळण्यास पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कठुआमध्ये चकमकीत जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी ठार दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये चकमकीत जैश ए मोहम्मद या संघटनेच्या एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. बिलावर परिसरात संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी (Terrorists ) मारला गेला, अशी माहिती जम्मू रेंजचे पोलीस महानिरीक्षक भीम सेन टुटी यांनी दिली. उस्मान असे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचं नाव असून, तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर आहे. त्याच्याकडील एम फोर स्वयंचलित रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं हस्तगत करण्यात आली आहेत. हेही वाचा: Rahul Gandhi On PM Modi : “साडेचार कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या आणि लाखो व्यवसाय धोक्यात”; टॅरिफवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल