Tejasvi Ghosalkar win। राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेत पहिला मोठा विजय समोर आला आहे. याठिकाणी काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या तेजस्वी घोसळकर यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपात केला आणि दहीसर वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारी मिळवली होती. त्यामुळे, दहीसर वार्ड क्रमांक 2 मधील निवडणुकीकडे मुंबईचे लक्ष लागले असून तेजस्वी घोसाळकर यांच्याविरुद्ध शिवसेनेनं त्यांच्याच मैत्रिणीला मैदानात उतरवलं होतं. मात्र, दहीसरच्या जनेतनं तेजस्वी घोसाळकरांना स्वीकारत मोठ्या मतांनी विजयी केलं भाजपच्या तेजस्वी घोसाळकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. दुसऱ्या फेरीअखेर तेजस्वी घोसाळकर यांना 11,964 मतं मिळाली होती, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या धनश्री कोलेगे यांना 4115 मतं मिळाली होती. आता, दहीसरच्या वार्ड 2 मधून तेजस्वी घोसाळकर भरगोस मतांनी विजयी झाल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांना 10755 मतांनी विजय मिळाला असून त्यांना एकूण 16,484 मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेच्या धनश्री कोलगे यांनी 5729 मतं घेतली आहेत.