Team India Daily Allowance hotel bills bcci : मैदानावर राजासारखे जगणारे आणि कोट्यवधींच्या मानधनात खेळणारे भारतीय क्रिकेटपटू हॉटेलमध्ये राहताना खिशातून एकही रुपया खर्च करत नसतील, असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडूही हॉटेलमधून बाहेर पडताना आपल्या खाण्यापिण्याचं बिल स्वतः भरतो. एका वृत्त संकेतस्थळाच्या तपासणीत भारतीय क्रिकेटपटूंच्या दौऱ्यांमधील खर्चाचे एक वेगळे वास्तव समोर आले आहे. काय आहे बीसीसीआयची ‘डेली अलाउन्स’ सिस्टीम? टीम इंडियाच्या व्यवस्थापनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय खेळाडूंच्या राहण्याची (हॉटेल) आणि प्रवासाची (विमान/बस) सर्व व्यवस्था करते. मात्र, हॉटेलमधील पॅकेजमध्ये केवळ नाश्ता (Breakfast) समाविष्ट असतो. याव्यतिरिक्त जेवण, स्नॅक्स किंवा इतर वैयक्तिक खर्चासाठी बीसीसीआय खेळाडूंना ‘डेली अलाउन्स’ (Daily Allowance) म्हणजेच दैनिक भत्ता देते. या भत्त्यातूनच खेळाडूंना आपले बिल भरावे लागते. कोणाला किती मिळतो भत्ता? (प्रतिदिवस) विविध स्तरावरील क्रिकेटपटूंना मिळणारा टीए-डीए (TA-DA) : क्रिकेटचा प्रकार मिळणारा दैनिक भत्ता आंतरराष्ट्रीय सामने (भारत) ₹६,८०० परदेश दौरा सुमारे १२५ डॉलर (अंदाजे ₹११,५००) आयपीएल खेळाडू ₹५,००० रणजी ट्रॉफी ₹१,००० ते ₹२,००० इतर देशांतर्गत स्पर्धा ₹५०० ते ₹२,००० हेही वाचा – Sarfaraz Khan Double Century : सर्फराझ खानचा कहर! रणजी ट्रॉफीत ठोकलं धडाकेबाज द्विशतक हॉटेलमध्ये बिल पेमेंट कसं होतं? टीम इंडियाच्या खेळाडूंचा दैनिक भत्ता हॉटेलमध्ये खेळाडूंसाठी कोणतीही ‘फ्री सिस्टम’ नसते. प्रत्येक खेळाडूने मागवलेल्या जेवणाचा किंवा सेवेचा हिशोब स्वतंत्रपणे ठेवला जातो. जेव्हा संघ हॉटेलमधून चेकआउट करतो, तेव्हा खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक खर्चाचे बिल दिले जाते. ही प्रक्रिया सामान्य पाहुण्यांसोबत काउंटरवर होत नाही, तर खेळाडूंसाठी हॉटेलमध्ये एक विशेष ‘कलेक्शन डेस्क’ तयार केला जातो, जिथे खेळाडू आपल्या भत्त्यातून हे पेमेंट करतात. भत्त्यात कोणत्या खर्चांचा समावेश होतो? बीसीसीआयने दिलेल्या डेली अलाउन्समध्ये खालील गोष्टींचा खर्च खेळाडूंना करावा लागतो: हॉटेल पॅकेजव्यतिरिक्त दुपारी आणि रात्रीचे जेवण. कपडे धुण्याचा खर्च (लॉन्ड्री). चहा, कॉफी आणि स्नॅक्स. वैयक्तिक वापरासाठी केलेला स्थानिक प्रवास. फोन किंवा इंटरनेटचा अतिरिक्त खर्च.