Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा केली. लवकर या, लवकर जा.. म्हणत महिलांना कामाच्या ठिकाणी लवकर आल्यास लवकर जाण्याची मुभा देण्यात येणार आहे. विधीमंडळातील आज सुनेत्रा पवारांचे पहिलेच भाषण होते. यावेळी त्यांनी सांगितले की, “आम्ही घोषणा करत आहोत की, मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कर्मचारी महिलांसाठी Come early Go early प्रणाली लागू करण्यात येत आहे.” जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar) यांच्याकडून राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ही योजना अंमलात आणण्यात आली.Sunetra Pawar सकाळी कामावर येताना मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही योजना आणण्यात आली आहे. राज्यातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी आता ९.१५ वाजता कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. Sunetra Pawar यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी लाडकी बहीण योजना, प्रसूती रजा, शक्ती कायदा आणि शेतकरी महिलांबाबत मोठे वक्तव्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचे त्यांनी सांगितले. विधान परिषदेत निवेदन करताना अजित पवार यांच्या कामाचा उल्लेख करत सुनेत्रा पवार भावुक झाल्या होत्या. Sunetra Pawar तसेच मेट्रोमनी साईड वरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी देखील कायदा करण्याबाबत प्रयत्न केले जातील.महिलांना १८० दिवसांची प्रसूती रजा मिळणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. त्याशिवाय अंगणवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील 17 हजार अंगणवाडीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहितीही सुनेत्रा पवार यांनी दिली. हेही वाचा: Hai Jawani To Ishq Hona Hai Movie : वरुण धवनच्या ‘है जवानी तो इश्क होना है’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली; कारण….