Sunetra Pawar : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या अखत्यारीतील तीन खात्यांपैकी एकाही खात्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं त्या स्वतः देणार नसल्याची माहिती आहे. संबंधित प्रश्नांना उत्तर देण्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आहे. क्रीडा आणि अल्पसंख्याक विभागाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मंत्री दत्तात्रय भरणे देणार आहेत. तर राज्य उत्पादन शुल्क खात्याशी निगडित प्रश्नांची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आली आहे. Sunetra Pawar माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar )यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर क्रीडा व युवा कल्याण, अल्पसंख्याक आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती त्यांच्याकडे देण्यात आली होती. अर्थखात्याची जबाबदारी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहे. Sunetra Pawar हे सुनेत्रा पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन असल्याने त्या सभागृहात काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्यांच्या खात्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं इतर मंत्र्यांकडे गेल्याने त्या सभागृहात मर्यादित भूमिका घेतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. (Sunetra Pawar) दरम्यान, अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाती निधनानंतर 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभा जागेवर पार्थ पवार यांना पाठवले जाणार असल्याची माहिती आहे.