Anjali Damania : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी जवळीक साधणे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना चांगलीच महागत पडली आहे. त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. राजीनामा दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “राजीनामा देताना रुपाली चाकणकर पोझ देऊन उभ्या होत्या, चाकणकरांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, संपदा मुंडे प्रकरणातच चाकणकरांचा राजीनामा घ्यायला हवा होता.” अशा शब्दांत दमानिया यांनी चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अंजली दमानिया यांनी वक्तव्य केले आहे. राजीनामा देताना सुनेत्रा पवारांचा चेहरा गंभीर होता रुपाली चाकणकर जसं मॅाडेलिंगसाठी उभं राहतात तसा त्यांचा पोझ देतानाचा फोटो बघितला. त्यामुळे त्यांना स्वतः आत्महपरीक्षण करण्याचे गरज आहे. सगळेजण ओष्णो जल घ्यायला जायचे तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, असे असताना तुम्ही केक खाताय? पाय पुजताय? पायावर डोकं ठेवताय? असे सवाल उपस्थित केले आहेत. हेही वाचा : Kerala Legislative Assembly : केरळसाठी भाजपकडून मास्टरप्लॅन! ‘या’ मुद्यांवर लक्ष केंद्रीत करणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी म्हणाल्या… Anjali Damania अंजली दमानियांची चाकणकरांवर सडकून टीका महाराष्ट्रातील पहिली स्त्री उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी अनेक गोष्टी करणे अपेक्षित होतं. पण तीन दिवस जेव्हा कळस झाला सगळ्यांनीच पत्रकार परिषदा घेतल्या त्यानंतर त्यांनी तो राजीनामा स्विकारला, असे वक्तव्य अंजली दमानिया यांनी सुनेत्रा पवार यांच्याविषयी केले आहे. …तेव्हाच तुमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता Anjali Damania कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर चहूबाजूंनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहे. काल त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आरोपांचे खंड केले. या विषयात एक महिला आहे म्हणून टार्गेट केले जात असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. यावर अंजली दमानिया यांनी संपदा मुंडे प्रकरणात तुम्ही तिच्यावर शिंतोडे उडवले असल्याचा आरोप करत तेव्हाच तुमच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता, असे म्हटले आहे. हेही वाचा : Fasting Weight Loss: व्रत ठेवल्याने खरंच वजन कमी होतं का? जाणून घ्या सत्य आणि गैरसमज