Sonia Gandhi: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेबाबत न्यायालयात आपले उत्तर दाखल केला आहे. वकील विकास त्रिपाठी यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली. उत्तर सादर केल्यानंतर, आता २१ फेब्रुवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये नागरिकत्व न घेता मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याबद्दल सोनिया गांधींविरुद्ध (Sonia Gandhi) खटला आणि चौकशीची मागणी करणारी याचिका दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली. काय प्रकरण आहे ? सोनिया गांधींविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत असे म्हटले आहे की १९८० च्या मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट असतानाही त्यांनी ३० एप्रिल १९८३ रोजी नागरिकत्व मिळवले. १९८० च्या नवी दिल्ली मतदार यादीत त्यांचे नाव कसे समाविष्ट केले गेले असा प्रश्न याचिकेत आहे. बनावट कागदपत्रे वापरली गेली का?: याचिकेत प्रश्न १९८२ मध्ये सोनिया गांधींचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप याचिकेत आहे. मतदार यादीतून त्यांचे नाव का वगळण्यात आले असाही प्रश्न याचिकेत आहे. शिवाय, याचिकेत विचारले आहे की, सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी १९८३ मध्ये नागरिकत्व मिळवले होते, तर १९८० मध्ये मतदार यादीत त्यांचे नाव कोणत्या आधारावर समाविष्ट करण्यात आले? यासाठी बनावट कागदपत्रे वापरली गेली का?