Smart Gadgets Banned Lok Sabha Secretariat। संसदेच्या आवारात स्मार्ट चष्मा, स्मार्ट पेन, स्मार्ट घड्याळे यासारख्या डिजिटल उपकरणांच्या वापराबाबत खासदारांनी सावध राहण्याचे आवाहन लोकसभा सचिवालयाने केले आहे. लोकसभा सचिवालयाने याविषयी माहिती देताना,”अशा उपकरणांच्या वापरामुळे खासदारांच्या गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो आणि संसदेच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन देखील होऊ शकते” असे म्हटले आहे. याविषयी माहिती देताना स्मार्ट चष्मा, पेन कॅमेरा आणि स्मार्ट घड्याळे यांसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली अनेक डिजिटल उपकरणे देशात सहज उपलब्ध असल्याची आठवण लोकसभेच्या बुलेटिनद्वारे खासदारांना करून देण्यात आली. गोपनीय संभाषणे, क्रियाकलाप किंवा माहिती रेकॉर्ड करण्यासाठी यापैकी काही उपकरणांचा गैरवापर केला जाऊ शकतो” असे त्यांनी म्हटले. त्यामुळे याच्या वापरावर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासदारांनी लोकसभेच्या बुलेटिनमध्ये दिला इशारा Smart Gadgets Banned Lok Sabha Secretariat। बुलेटिन चेतावणी देते की अशा उपकरणांच्या वापरामुळे खासदारांच्या गोपनीयतेला हानी पोहोचते आणि संसदीय विशेषाधिकारांचे उल्लंघन होऊ शकते. लोकसभा सचिवालयाने म्हटले आहे की, सदस्यांना विनंती आहे की त्यांनी संसद भवन संकुलाच्या कोणत्याही भागात अशी उपकरणे वापरणे टाळावे, ज्यामुळे सदस्यांची सुरक्षा, संसदीय विशेषाधिकार आणि गोपनीयतेशी तडजोड होऊ शकते. विशेष म्हणजे हे नियम मोबाईल इत्यादी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आधीच लागू आहेत. खासदारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि संसदेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या सूचना पुन्हा जारी करण्यात आल्या आहेत. संसदेच्या संकुलात ई-सिगारेटवरून गदारोळ हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या आवारात टीएमएस खासदाराने ई-सिगारेट ओढल्याने वाद झाला आहे. या प्रकरणी सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तक्रारही करण्यात आली होती. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी ही बाब संसदेत मांडली होती. त्यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचेही स्पीकर बोलले होते. अशाच प्रकारची प्रकरणे समोर येत असल्याने आणि डिजिटल उपकरणांचा वाढता वापर यामुळे पुन्हा ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. अशा उपकरणांमुळे संसदेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यताही लोकसभा सचिवालयाने व्यक्त केली आहे.