Gold Silver Price: गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या दरवाढीला गुरुवारी अचानक ब्रेक लागला. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल २४,००० रुपयांची मोठी घट झाली असून, सोन्याचे भावही १८०० रुपयांनी कोसळले आहेत. या अचानक झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही खळबळ उडाली आहे. चांदीच्या किमतीत मोठी पडझड – मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवारी चांदीच्या वायदा दरात घसरण नोंदवण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास चांदीचा भाव थेट २,४३,५०० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. म्हणजेच चांदी २४,९५० रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे. २९ जानेवारी रोजी चांदीने ४,२०,०४८ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. त्या तुलनेत चांदी आता आपल्या उच्चांकी स्तरावरून सुमारे १.७७ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. Gold Rates: सोने पुन्हा 70 हजारांवर येणार? जागतिक घडामोडींमुळे किमतीत घसरणीचे संकेत; वाचा तज्ज्ञांचे मत सोन्याचे दरही घसरले – चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातही आज मोठी घसरण दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज १,५१,१९७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. सोन्याच्या किमतीत आज १८५० रुपयांहून अधिक घट झाली. विशेष म्हणजे, २९ जानेवारीला सोन्याने १,९३,०९६ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. सध्याचा भाव पाहता, सोने आपल्या उच्चांकी दरापेक्षा सुमारे ४२,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. घसरणीचे मुख्य कारण काय? बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावरील संकेत, डॉलरचा मजबूत होणारा दर आणि गुंतवणूकदारांकडून केली जाणारी नफेखोरी (Profit Booking) यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव वाढला आहे. लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचे भाव कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असून, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे. Todays Top 10 News: अजित दादांचा ‘तो’ अखेरचा व्हिडिओ समोर ते सोने 70 हजारांपर्यंत घसरणार?… वाचा आजच्या टाॅप बातम्या