Santosh Bangar | राज्यातील २२६ नगर परिषदा आणि ३८ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली आहे. त्यानुसार अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी झाली आहे. हिंगोलीतील कळमनुरी येथेही मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र शिवसेना शिंदेसेनेच्या आमदारांकडूनच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. शिवसनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. बांगर यांच्याकडून महिलेस सूचना परंतु संतोष बांगर यांनी मतदान केल्यानंतर केंद्रात घोषणाबाजी केली. याशिवाय बांगर यांनी एका महिला मतदाराला जाऊन सांगितले कुठे मतदान करायचे? ईव्हीएमचं बटण दाबताना बांगर यांच्याकडून महिलेस सूचना देण्यात आल्या. यावेळी मतदान केंद्रातला बांगर यांचा वावरही संशयास्पद जाणवला. Santosh Bangar | मतदान केंद्रात येताच बांगर यांनी ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है’, असं म्हणत घोषणाबाजी केली. याप्रकरणी आता बांगर यांच्यावर निवडणूक आयोगाकडून काय कारवाई केली जाणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. Santosh Bangar | हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात; ३५ ते ४० विद्यार्थी जखमी