Sharad Pawar : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे नेते बैठका घेत तारीख ठरल्याचे देखील सांगत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात उडी घेत प्रतिक्रिया दिली होती. विलीनीकरणाची शक्यता फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतर आता यावर शरद पवार यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री? विलीनीकरणाचा मुद्दा असता तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं, त्याची कल्पना मला दिली असती, असे म्हणत जर विलीनीकरणाचा मुद्दा होता तर ते एनडीएसोबत आले असते का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यादरम्यान विलीनीकरणाबाबत नेमके काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. अशा प्रकारची कोणती तारीख ठरली होती, त्याची माहिती मला नाही, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली होती. अजितदादांचे आणि माझे वैयक्तिक संबंध खूप वेगळे होते. त्यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच आम्ही एक तास गप्पा मारल्या होत्या, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. शरद पवारांचे प्रत्युत्तर फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार यांनी कडक शब्दांत प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी माझं नाव घ्यायचा काय संबंध आहे, या सर्व चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा काही अधिकार आहे, असं मला वाटतं नाही, अशा कडक शब्दांत शरद पवार यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांच्या निधानानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवारांना संधी मिळाली, याने मी आनंदी आहे. उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून मी खुशीने सुनेत्रा पवारांना आशीर्वाद देईल. तसेच त्यांच्या शपथविधीसंदर्भात भाष्य करायचं नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. हेही वाचा : Sharad Pawar on India Us trade deal: भारत आणि अमेरिका व्यापार करारावर शरद पवारांची प्रतिक्रिया; शेतकऱ्यांबाबत चिंता व्यक्त करत म्हणाले…