Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. पवार कुटुंबासाठी हा सर्वात मोठा आघात आहे. शरद पवार यांना ही बातमी समजल्यानंतर ते तातडीने बारामतीकडे आले होते. त्यांनी जिथे अजित पवारांचे पार्थिव ठेवले होते, त्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान येथे गेले. यानंतर शरद पवार संध्याकाळी माध्यमांसमोर आले. ते दिवसभर काहीच बोलले नाहीत. त्यांच्यासाठी अजित पवारांचा मृत्यू हा मोठा धक्का होता. ज्यावेळी ते माध्यमांसमोर आले त्यावेळी ते पूर्णपणे खचलेले दिसले. त्यांना सुरूवातील बोलण्यास ही त्रास होत होता. त्यांच्या तोंडून शब्द ही फुटत नव्हेत. डोळ्यात अश्रू होते. आवाज थरथरत होता. Ajit Pawar हा कुटुंबासाठी मोठा धक्का आहे हे त्यांचे पहिले शब्द होते. नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. हे कोणाच्या हातात नसते. हा निव्वळ अपघात आहे. राजकारण नाही, असे म्हणत शरद पवारांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली. ते माध्यमांसमोर रडू लागले. एवढे छोटेसे निवेदन करून ते थांबले. हे नुकसान कधीही भरून न निघणारं आहे – शरद पवार या संपूर्ण घटनेवर आता स्वतः शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. शरद पवार म्हणाले, “हा निव्वळ अपघात आहे, यात कुठेही राजकारण नाही. अजित पवारांच्या निधानानं राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. हे नुकसान कधीही भरून न निघणारं आहे’. असं ते म्हणाले. हे देखील वाचा : Ajit Pawar : अजित पवारांच्या अपघाताचं गुढ उलगडणार; विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला