PMC Election 2026 | राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पुण्यातही मतदान केंद्रावर खास करून ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून मतदान करण्यास सुरूवात केली आहे. प्रभाग 2 नागपुरचाळ फुलेनगर येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेत मतदानाकरिता जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळाले. नागपुरचाळ फुलेनगर येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळेत जाण्यासाठी असणारा रस्ता विश्रांतवाडी पोलिसांनी सुरक्षेच्या व पार्किंगच्या कारणावरून सिमेंटचे पाईप टाकून बंद केला आहे. या कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांना लांब चालत जावे लागत आहे. हेही वाचा: ‘अत्यंत गंभीर अन् चिंताजनक’ ; शशी थरूर यांनी ७५% अमेरिकन शुल्कांवर व्यक्त केली चिंता