Sawantwadi Municipal Council। राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. समोर येत असलेल्या अनेक निकालावरून प्रस्थापितांना धक्का बसल्याचे दिसत आहे. असाच प्रकार कोकणातही घडून आला आहे. कोकणातील सावंतवाडीत शिन्देगटाचे नेते दीपक केसरकारांना मोठा धक्का बसला आहे. कारण याठिकाणी भाजपने आपला विजय नोंदवला आहे. सावंतवाडी नगर परिषदेवर भाजपने आपला झेंडा फडकवलेला आहे. राज घराण्यातील श्रद्धाराजे भोसले या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे हा विजय दीपक केसरकर यांना मोठा धक्का मानला जात आहे. दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सत्ता खेचून आणली आहे. सध्या याठिकाणी मोठा जल्लोष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याठिकाणी शिंदेसेनेच्या नीता कविटकर यांचा पराभव करत श्रद्धाराजे भोसले विजयी झाले आहेत. Sawantwadi Municipal Council।