Ruturaj Gaikwad reveals about Sanju Samson : आयपीएल २०२६ च्या हंगामात संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या पाच हंगामांपासून राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करणाऱ्या संजूचे अखेर चेन्नईसाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे, चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एका मुलाखतीत केलेल्या खुलाशामुळे संजूच्या या निर्णयामागचे गुपित उघड झाले आहे. गायकवाडची कॅप्टनसी आणि संजूची इच्छा – Ruturaj Gaikwad Reveals सीएसकेच्या युट्यूब चॅनेलवरील एका मुलाखतीत ऋतुराजने सांगितले की, २-३ वर्षांपूर्वीच संजूने चेन्नईत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. संजूने ऋतुराजला विचारले होते, “माही भाई (धोनी) कसे आहेत? तू पुढचा कर्णधार होणार का?” त्यावर ऋतुराजने अनभिज्ञता दर्शवली असता संजू म्हणाला होता, “मला कर्णधार व्हायची इच्छा नाही, पण मला तुझ्या नेतृत्वाखाली एक साधा खेळाडू म्हणून चेन्नईसाठी खेळायला नक्कीच आवडेल.” जडेजा आणि सॅम करनच्या बदल्यात ट्रेड – ऋतुराज गायकवाड यांचा संजू सॅमसनबद्दल खुलासा (Ruturaj Gaikwad Reveals) संजू सॅमसनने २०१३ मध्ये राजस्थानमधून आयपीएल पदार्पण केले होते. एकूण १३ हंगामांपैकी ११ हंगाम तो राजस्थानसोबत होता. मात्र, २०२५ च्या हंगामानंतर त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सने संजूला चेन्नईकडे ट्रेड केले आणि त्या बदल्यात चेन्नईने आपले दोन दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानला दिले. हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड मानला जात आहे. हेही वाचा – MS Dhoni Injury : CSK च्या १६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार ‘असं’! गुवाहाटीच्या मैदानात धोनीच्या चाहत्यांचा होणार हिरमोड १४९ सामने राजस्थानसाठी खेळणाऱ्या संजूसाठी आता एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या तालमीत आणि ऋतुराजच्या नेतृत्वाखाली संजू कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Ruturaj Gaikwad Reveals