Sanjay Raut : मद्यविक्री घोटाळ्याशी संबंधित लाचखोरी प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांची न्यायालयाने निर्देाष मुक्तता केली आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य 23 आरोपींसह राउस एव्हेन्यू विशेष न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त ठरवले आहे. या निर्णयामुळे केजरीवाल, सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयावर उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत मोठी मागणी केली आहे. केजरीवाल नेहमीच सांगत होते की मद्य धोरणात कोणताही गैरप्रकार झालेला नाही. ह्या केसमध्ये पुरावे नसतानाही अटक करण्यात आली. त्यांनी या सीबीआय अधिकाऱ्यांवर कारवाई, निलंबन आणि खटले चालवण्याची मागणी केली असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी दिली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी केजरीवाल यांची माफी मागावी, अशी मोठी मागणी राऊतांनी केली आहे. “या प्रकरणात सीबीआयने आरोप दाखल करून केजरीवाल आणि इतरांना अटक केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि तत्कालिन नायब राज्यपाल यांच्याकडून या प्रकरणावर मोठा दबाव होता,” असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी केला आहे. केजरीवाल काय म्हणाले? Sanjay Raut Sanjay Raut on Kejriwal न्यायालयाने निर्देाष मुक्तता केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. “आम्ही नेहमी सांगायचो सत्याचा विजय होतो. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला त्यांचे धन्यवाद. सत्याचा विजय झाला, मी नेहमी सांगायचो भगवान आमच्यासोबत आहे. मोदीजी आणि अमित शाह यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात राजकीय षडयंत्र रचलं. केजरीवाल भ्रष्ट नाही. केजरीवाल भ्रष्ट नाही. मी माझ्या आयुष्यात इमानदारी कमावली. यांनी खोटी केस लावली, ते आज सिद्ध झालं.” अशी सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी दिली. नेमकं प्रकरण काय? हे प्रकरण दिल्ली सरकारच्या 2021-22 अबकारी धोरणाशी संबंधित आहे. आम आदमी पार्टी सरकारने हे धोरण नोव्हेंबर 2021 मध्ये लागू केले होते. या धोरणाचा उद्देश दिल्लीत मद्य विक्री व्यवस्था सुधारणे असा होता. या धोरणावर CBI आणि ED ने आरोप करण्यात आला. धोरण जाणीवपूर्वक असे बनवले गेले की ज्यामुळे काही खास मद्य व्यावसायिकांना फायदा होईल, असे म्हटले. धोरणातून (लाच) मिळवण्यासाठी 12% मार्जिन 6% च्या ऐवजी दिले गेले. यातून आपने पैसे गोळा केले आणि ते पक्षासाठी वापरले, असा ठपका ठेवण्यात आला होता. हेही वाचा : Accident News : कात्रजमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ट्रकच्या धडकेत ३ वर्षीय चिमुरड्याचा जागीच अंत