Sajjan Kumar । १९८४ च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित एका प्रकरणात आरोपी असलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. सज्जन कुमार यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने जनकपुरी-विकासपुरी हिंसाचार प्रकरणात निकाल दिला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये, विशेष न्यायाधीश दिग्विजय सिंह यांनी अंतिम युक्तिवादानंतर निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज सुनावणी करण्यात आली. सज्जन कुमारविरुद्ध ३ खूनांसाठी २ FIR दाखल Sajjan Kumar । या प्रकरणात जनकपुरीमध्ये सोहन सिंग आणि अवतार सिंग यांच्या हत्येचा तसेच विकासपुरीमध्ये गुरचरण सिंग यांना जिवंत जाळण्याचा समावेश होता, ज्यामध्ये सज्जन कुमार यांना महत्त्वपूर्ण दिलासा मिळाला होता. फेब्रुवारी २०१५ मध्ये, विशेष तपास पथकाने (एसआयटी) पीडितांच्या तक्रारींच्या आधारे सज्जन कुमारविरुद्ध दोन एफआयआर दाखल केले आणि तेव्हापासून हा खटला न्यायालयात प्रलंबित होता. Sajjan Kumar Image पहिल्या एफआयआरमध्ये सज्जन कुमारवर १ नोव्हेंबर १९८४ रोजी जनकपुरी येथे सोहन सिंग आणि त्यांचा जावई अवतार सिंग यांची हत्या केल्याचा आरोप होता. दुसरा एफआयआर २ नोव्हेंबर १९८४ रोजी विकासपुरी येथे गुरचरण सिंग यांना जिवंत जाळल्याच्या घटनेशी संबंधित होता. एसआयटीने आरोप केला आहे की सज्जन कुमार यांनी आपल्या प्रक्षोभक भाषणांनी जनतेला भडकावले, ज्यामुळे हे हत्याकांड घडले. सज्जन कुमारला यापूर्वी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सज्जन कुमार यांना यापूर्वी दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील सरस्वती विहार परिसरात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग या दोघांना जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणात सज्जन सिंगवर जमावाला भडकावल्याचाही आरोप होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सज्जनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय, सज्जन कुमार दुसऱ्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्यामुळे तो अजूनही तुरुंगातच राहणार आहे. जनकपुरी-विकासपुरी प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाली असली तरी, तो तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही. तरीही, निर्दोष मुक्तता ऐकताच, सज्जन कुमारने चेहऱ्यावर हलकेसे स्मितहास्य आणि हात जोडून न्यायाधीशांचे आभार मानले. १९८४ मध्ये शीखविरोधी दंगली का उसळल्या? Sajjan Kumar । ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यांच्या शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर दिल्लीसह अनेक शहरांमध्ये शीखविरोधी दंगली उसळल्या. सुमारे तीन ते चार दिवस चाललेल्या या दंगलींमध्ये संतप्त जमावाने शीखांची घरे जाळली. जमावाने शीख समुदायाच्या सदस्यांना ठार मारले, दुकाने लुटली आणि अनेक हत्याकांड केले.