Russia-Ukraine War। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ते कराराच्या अगदी जवळ आहेत असे म्हटले आहे. तसेच जरी त्यांना सुरुवातीला वाटले होते की ते काही तासांतच यावर पोहोचतील पण ते शक्य झाले नाही” असे सांगितले. ट्रम्प यांनी असेही म्हटले की,”जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी हे युद्ध आता संपवले नाही तर ते मूर्ख ठरतील आणि मला माहिती आहे की ते तसे नाहीत” दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) वार्षिक बैठकीदरम्यान, ट्रम्प म्हणाले की, “ते संघर्ष सोडवण्यात चांगले आहेत, मात्र हे काम संयुक्त राष्ट्रांनी हाताळले पाहिजे” रशिया-युक्रेन युद्धाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “मला हे सांगताना वाईट वाटते, परंतु मी चारपेक्षा जास्त प्रकरणे सोडवली आहेत.” तसेच आता मला हे करावेच लागेल. त्यामुळे लाखो जीव वाचतील”. युक्रेन आणि रशियामधील, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यातील तीव्र द्वेष ही चांगली गोष्ट नाही.” असेही त्यांनी यावेळी म्हटले. रशिया-युक्रेन युद्धावर ट्रम्प यांचे विधान Russia-Ukraine War। ट्रम्प म्हणाले, “मला वाटते की रशियाला तडजोड करायची आहे. तसेच युक्रेनलाही तडजोड करायची आहे आणि आम्ही तडजोड करण्याचा प्रयत्न करू. मला वाटते की आम्ही तडजोडीच्या अगदी जवळ आहोत. होत असलेला हा रक्तपात भयानक आहे. ड्रोन हल्ल्यात आठवड्याला हजारो लोक मरतात. आपल्याला ते थांबवावे लागेल.” ते पुढे म्हणाले, “म्हणून मला वाटते की ते आता अशा टप्प्यावर आहेत जिथे ते एकत्र येऊन तडजोड करू शकतात. मी आता राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना भेटणार आहे. मला माहित आहे की ते मूर्ख नाहीत. मला कोणाचाही अपमान करायचा नाही, पण तुम्हाला ही तडजोड करावी लागेल. बरेच लोक मरत आहेत.” ट्रम्प यांचे चीनबद्दलचे विधान Russia-Ukraine War। ट्रम्प यांनी चीनबद्दल बोलताना,”चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपले संबंध नेहमीच खूप चांगले राहिले आहेत, ते एक असाधारण माणूस आहेत आणि त्यांनी जे केले आहे ते कौतुकास्पद आहे.” असे म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले की, शी यांच्याशी त्यांचे संबंध कोविड-१९ मुळे लक्षणीयरीत्या चांगले झाले आहेत. ट्रम्प म्हणाले, “मी त्याला चिनी विषाणू म्हणत असे, पण ते म्हणाले, ‘तुम्ही दुसरे नाव वापरू शकता का?’ आणि मी ते करण्याचा निर्णय घेतला. ते का समस्या असू शकते? पण पहिल्यांदाच मी राजनयिक झालो.”असेही त्यांनी म्हटले . ग्रीनलँडचा उल्लेख केला ग्रीनलँडबद्दल, ते म्हणाले की, त्यासाठी दरवर्षी डेन्मार्कला अब्जावधी अमेरिकन डॉलर्सचा खर्च येतो आणि डेन्मार्क हा एक छोटासा देश आहे जिथे लोक खूप चांगले आहेत. ट्रम्प म्हणाले, “जर आपण (युक्रेन युद्धात) हस्तक्षेप केला नसता, तर मला वाटते की तिसरे महायुद्ध सुरू झाले असते. जर कमला हॅरिस, जो बायडेन किंवा यापैकी कोणीही नेते निवडून आले असते, तर मला वाटते की आपण तिसऱ्या महायुद्धात अडकलो असतो.”असे म्हणत त्यांनी आपल्याच नेत्यांवर टीका केली. पुढे ते म्हणाले, “पण आता आपण तिसरे महायुद्ध होऊ देणार नाही आणि आपल्याला ते रोखायचे आहे. ही परिस्थिती खूप भयानक असती, अजूनही आहे, पण यासारखी वाईट नाही.” हे वाईट आहे कारण इतके तरुण मारले गेले आहेत.