Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आज एसआयटीसमोर हजर झाल्या आहेत. आज सकाळीच त्या पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्या होत्या. एसआयटी चौकशी अगोदर रुपाली चाकणकरांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. एसआटीचा जो तपास सुरू आहे, त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील आणि त्यांना काही उत्तर हवे असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे. त्यांना तपासात माझे पूर्णपणे सहकार्य राहील. तपासाला सामोरे जात असताना जी जी मदत पोलिसांना आणि तपास अधिकाऱ्यांना हवी असेल त्याला मी सहकार्य करेल. तपास पूर्ण झाल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी प्रतिक्रिया देत अधिकचे भाष्य करणे टाळले. त्यामुळे एसआयटी चौकशीत त्यांना काय प्रश्न विचारले जातात त्याचा तपशील चौकशी पूर्ण झाल्यानंतर समोर येईल. अशोक खरात प्रकरणाच्या एसआयटी प्रमुख पोलिस अधिकारी तेजस्वी सातपुते या रुपाली चाकणकरांची चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. दमानियांचा गंभीर आरोप दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा बनल्या? याची चौकशीची मागणी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुनील तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठिशी खंबीर उभे होते, असा गंभीर आरोप केला. यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचे चित्र आहे. हेही वाचा : Thalapathy Vijay: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय in Action Mode ; विजय यांनी केली ‘या’ पहिल्या तीन आदेशावर स्वाक्षरी